– पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ९ वर्षांच्या विकासकामांचा सांगितला लेखाजोखा!
सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – जल जीवन मिशन योजनेअंतर्गत सोलापूर जिल्ह्यात होणारे काम चांगले झाले पाहिजे, असा आमचा आग्रह आहे. या कामांमध्ये कोणी चुकीचे काम केले तर त्यांची चौकशी करून त्यांच्यावर एक महिन्याच्याआत कारवाई कारवाई करणार असल्याची ग्वाही खासदार डॉ. जय सिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली आहे. मोदी सरकारला नऊ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल विविध योजनांची माहिती देण्यासाठी शहरातील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी खा. महास्वामी बोलत होते. यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, पुण्याचे माजी महापौर मुरलीधरन मोहोळ, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, शशिकांत चव्हाण आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना खा. महास्वामी म्हणाले केंद्र सरकारच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना शहरी भागासाठी ८ हजार घरकुलाची काम पूर्ण झाले आहे. त्यात ग्रामीण २५ हजार घरकुलाचा समावेश आहे. पी.एम. स्वनिधी योजना २२ हजार, मुद्रा योजना २ लाख ३९ हजार, पीएम किसान योजना ६ लाख ४० हजार,राष्ट्रीय महामार्ग रस्ते पूर्ण असून ३१२७ कोटी रूपये मंजुर झाले. त्यात ४४७ कि.मी. लांबीचे रस्ते १५.९६२ कोटी रुपये, पी.एम. किसान सन्मान निधी योजना, एकूण ४७ प्रकल्पांपैकी ४१ प्रकल्प पूर्ण असून ६ प्रकाल्पांचे काम सुरू आहे. ११ तालुक्यातील १ हजार २८ ग्रामपंचायतीना इंटरनेट सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. विशेषता स्वच्छ भारत मोहीम, उज्वला महिला गॅस योजना, मातृत्व रजा, जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री आवास योजना, महिला सशक्तीकरणासाठी, पंतप्रधान किसान योजना, खताच्या किमतीत घट, बी बियाण्यासाठी कर्जाची गरज नाही, कृषी सिंचन योजना, कोविड काळात लसीकरण यासह नऊ वर्षांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गोरगरीब जनतासह सर्व घटकासाठी काम केले आहे, असे खासदार महास्वामी यांनी सांगितले.
खासदार निधी आठ कोटी रुपये खर्च
केंद्र सरकारकडून खासदार फंड म्हणून सोलापूरसाठी जवळपास १७ कोटी रुपये मिळाले होते. त्यापैकी आठ कोटी रुपये खर्च झाले आहेत. उर्वरित खर्चदेखील लवकरच होण्याचे संकेत याप्रसंगी खासदार डॉ. महास्वामी यांनी प्रसारमाध्यमांना दिलेत.
————