Aalandi

आळंदीत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन महोत्सवाचे आयोजन

आळंदी (अर्जुन मेदनकर) : येथील श्री विठ्ठल वारकरी सेवा संस्थेच्यावतीने सद्गुरू स्वानंद सुखनिवासी विष्णुबुवा जोग महाराज यांचे मूर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा आळंदीत आयोजित करण्यात आला आहे. या निमित्त ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, कीर्तन महोत्सव होत आहे.

या सोहळ्याचे आयोजन शनिवार (दि.१३) ते मंगळवार (दि.१६) या काळात होत आहे. ह.भ.प. गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली जोग महाराज मूर्ती प्राण प्रतिष्ठापना सोहळा साजरा होणार आहे. या सोहळ्यात पहाटे ४ काकडा भजन, सकाळी ६ ते ९, दुपारी ३ ते ६ यावेळेत ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, संध्याकाळी ६ ते ७ हरिपाठ, रात्री ७ ते ९ हरिकीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. या सोहळ्यात सुदाम महाराज आदमाने, पद्माकर महाराज पाटोळे, गाथामूर्ती रामभाऊ महाराज राऊत, मारुती महाराज कुर्‍हेकर यांची किर्तने होणार आहेत. श्री विठ्ठल वारकरी शिक्षण सेवा संस्थेतर्पेâ भाविक, वारकरी, साधक, नागरिकांना सोहळ्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!