Pachhim MaharashtraSOLAPUR

झेडपीची एफ.एम.एस. साईड दोन दिवसापासून बंद!

सोलापूर (संदीप येरवडे) – सोलापूर जिल्हा परिषदेची एफ. एम. एस. साईड गेल्या दोन दिवसापासून बंद आहे. त्यामुळे झेडपीच्या एफडी विभागात ठेकेदार बिलासाठी चकरा मारत आहेत. तर दुसरीकडे मार्च एण्ड आज संध्याकाळी क्लोज होत असल्यामुळे बिले खात्यावर टाकण्याची लगीनघाई रात्री कर्मचारी करीत होते.

जिल्हा परिषदेची फायनान्शियल मॉनिटरी ही प्रणाली गेल्या दोन दिवसापासून बंद आहे. त्यामुळे बिले टाकण्याची प्रक्रिया बंद झाली असल्याची ओरड झाले आहे. दुसरीकडे मार्च एंड पूर्वी खर्च करणे अपेक्षित असा तो निधी मार्च क्लोज पर्यंत खर्च करता येत असल्यामुळे आज रात्री उशिरापर्यंत खात्यावर बिले टाकण्याचे काम झेडपीच्या एफडी मध्ये कर्मचारी करीत होते. मार्च २०२३ पर्यंत जो निधी तो निधी खर्च झाला असल्याचा विश्वास अधिकार्‍यांना आहे त्यामुळे जवळपास १००ज्ञ् मध्ये सर्व विभागाचा खर्ची पडला असल्याचे अधिकार्‍याकडून सांगण्यात आले.

दरम्यान, या मार्च एंड मुळे करण्यात आलेल्या विकास कामाचा निधी वेळेवर मिळत नाही. ऑनलाइन प्रणालीच बंद झाल्यामुळे काही ही प्रणाली कधी सुरू होणार आणि तेव्हाच ठेकेदारांना बिले मिळणार असल्याचे कारण सध्या अधिकारी देत असल्यामुळे ठेकेदारांना हेलपाटे मारावे लागत आहे. सध्या जिल्हा परिषदेचा मार्च एंड पूर्वी जो निधी खर्च करणे अपेक्षित होते तो सर्व निधी खर्च झाला आहे. त्याची सर्व आकडेवारी दोन दिवसात आम्ही देणार असल्याची माहिती झेडपीचे कँफो सुरवसे यांनी सांगितले.
————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!