Pachhim MaharashtraPolitical NewsPolitics

महिला कर्मचार्‍यांना साड्यावाटप करून प्रकाश आंबेडकरांचा वाढदिवस साजरा

चापडगाव, जि.नगर (पांडुरंग गोरे) – वंचित बहुजन आघाडी शेवगाव शहर व तालुक्याच्यावतीने शेवगाव शहरात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा.किसन चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने शेवगाव नगरपरिषदेमधील सर्व महिला कर्मचार्‍यांना साड्या वाटप करण्यात आले.

वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण, शेवगाव नगर परिषद बाधंकाम सभापती कैलास तिजोरे, शेवगाव नगर परिषद मुख्याधिकारी सचिन राऊत, तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई यांच्या हस्ते साड्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शेवगांव नगर परिषद कामगार संघटना अध्यक्ष रमेश खरात, उपाध्यक्ष सुरज मोहीते, राजूभाई काझी, राजू नाईक, देवदान कांबळे, भानुदास गायकवाड, सरपंच विष्णु तुजारे, जिल्हा सघंटक सुरेश खडांगळे, बर्वेमामा, शेख सलीम जिलानी, शामभाऊ शिंदे, संजय लांडे पाटील, शेख राजुभाई, कडुमामा मगर, डॉ दिलीप वाघमारे, रईस सौदागर व इतर सामाजिक कार्यकर्ते तसेच वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब आंबेडकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देवून दीर्घायुष्यास प्रार्थना करण्यात आली. या प्रसंगी तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी बोलतांना प्रा. किसन चव्हाण म्हणाले, की आम्हाला अभिमान आहे की आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत वंचित, उपेक्षित, शोषित, कष्टकरी, शेतकरी, कामगार या पिचलेल्या वर्गासाठी रस्त्यावर उतरून चळवळीत काम करतो. बाळासाहेब आंबेडकर हे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे रक्ताचे व विचाराचे खरे वारसदार आहेत. देशातील मनुवादी व्यवस्थेला फक्त आणि फक्त बाळासाहेब आंबेडकर हेच थोपवू शकतात. कारण सर्व समाज बांधवांना एकत्रित करुन वंचितांची मोटबांधुन वयाची सत्तरी ओंलाडुंनही तरुणाला लाजवेल, असे कार्य ते करत आहे. शेवगाव, पाथर्डी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रकाश आंबेडकर यांना दीर्घायुष्य लाभो हीच परमेश्वर चरणी प्रार्थना करतो, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शेख प्यारेलालभाई यांनी केले तर सर्व उपस्थितांचे आभार राजू नाईक यांनी व्यक्त केले.
————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!