चिखली ग्रामीण (सुनील मोरे) – चिखली ते खामगांव रोडवरील असलेल्या पेठ गावाजवळ अरुंद पुल आहे, या अरूंद पुलामुळे गेल्या अनेक वर्षांपासून अपघातांची मालिका सुरूच आहे. त्यामध्ये दि. ९ मे रोजी रात्रीला ११.३० वाजेच्यांदरम्यान खासगी ट्रॅव्हल्सची बस अरुंद पुलावरून खाली कोसळली आणि २० पेक्षा अधिक जण अतिगंभीर जखमी होवून दोन महिला ठार झाल्यात. या अरूंद पुलाचा कालावधी संपलेला असतांना अद्यापर्यंत दुरुस्ती करण्यात आली नाही, त्यामुळे घडत असलेल्या अपघाताला प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव यांनी करून, तातडीने पूल दुरूस्त न झाल्यात उपोषणाचा इशारा दिला आहे.
खामगांव ते जालना नॅशनल हायवे रोडच्या चौपदरी काम गेल्या तीन वर्षांपासून पूर्ण करण्यात आले. काम करतेवेळी संबधित विभागाने रोडवर ठिकठिकाणी नव्याने पुलाचे बांधकाम केले. त्यामध्ये काही जीर्ण झालेले पुल तोडून नवीन बाधले. मात्र पेठ या गावालगत असलेला पूर्वीचा जीर्ण झालेला अरुंड पुल आहे. त्याचे रूंदीकरण झाले नाही. नव्याने रोडचे काम झाल्याने मोठया प्रमाणावर अरुंद पुलावरून लहान मोठी वाहने रोडवरून धावतात, या धावपळी मध्ये पेठच्या अरुंद पुलावर नेहमी आपघात घडत आहेत. त्यामध्यें या जुन्या अरुंद पुलाचा कालावधी संपलेला आहे. मात्र प्रशासनाकडून या पुलाचे नूतनीकरण करण्यात आले नाही, यामुळे अपघाताचे प्रमाण वाढतच आहे. त्यामध्ये खामगाव ते चिखली रोडचे काम पूर्ण झाल्यासारखे आहे. त्यामध्ये दि. ९ मे रोजी रात्रीला ११.३० वाजेच्यां दरम्यान खासगी ट्रॅव्हल्सची बस अरुंद पुलावरून खाली कोसळली आणि २० पेक्षा अधिक जण अतिगंभीर होवून दोन महिला ठार झाल्यात. परंतु या रोडचा मार्ग पुलाच्या बाजूला शेतकर्यांच्या शेतातून गेल्यामुळे त्या दिशेने सर्व्हे करून खुणा रोवण्यात आल्या आहे. परंतु संबधित अधिकार्यांनी शेतकर्यांना भेटून त्यांना त्यांचा मोबदला देऊन रोडचे काम पूर्ण करायला हवे होते. परंतु तसे झाले नाही. संबधित प्रशासनाने याकडे तात्काळ लक्ष देऊन रोडचे व पुलाचे काम करावे. नाही तर असे अपघात होतच राहील. नुकत्याच झालेल्या अपघाताला प्रशासनिक दिरंगाई कारणीभूत आहे . संबधित विभागाने त्वरित पुलाचे काम सुरू करावे, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते मनोज जाधव व ग्रामस्थ करीत आहे. जर कामाला सुरू करण्यास विलंब लावल्यास संबधित कार्याला निवेदन देऊन लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. आणि याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील, असेही जाधव व ग्रामस्थांनी म्हटले आहे.
—————-