LONAR

बिबी येथे महाराणा प्रताप जयंती उत्साहात साजरी

बिबी, ता. लोणार (ऋषी दंदाले) – हिंदूसूर्य महाराणा प्रताप यांची जयंती बिबी येथे मंगळवारी मोठ्या उत्साहात व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी सरपंचपुत्र दीपक गुलमोहर यांच्याहस्ते महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले व सामूहिक महाआरती घेण्यात आली. यावेळी काही मान्यवरांनी महाराणा प्रताप यांच्या जीवन चरित्रावर मनोगत व्यक्त केले.

यावेळी शंभुराजे ग्रुपचे अध्यक्ष कैलासभाऊ मोरे व ग्रुप तसेच आनंद आटोळे, भास्कर खुळे उपसरपंच, प्रताप चव्हाण, वैभव शिंदे, चेतन बनकर, सचिन रणमाळे, अतिश तायडे, कृष्णा पंदे, प्रमोद गावडे, शिवशंकर चव्हाण, श्याम पाटोळे, गावातील पुरुष, तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी शिवराणा मित्र मंडळ, महाराणा प्रताप समिती बिबी यांनी परिश्रम घेऊन जयंती उत्सव आनंदात शांततेत साजरा करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!