पारनेर (प्रतिनिधी) : पक्षीय राजकारणामुळे विकास होत नाही, विकास कामांना गती देण्यासाठी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र आले पाहिजे. त्या माध्यमातून तालुक्यातील विविध विकास कामे मार्गी लागतील. लोणी हवेलीकरांचे स्व. आमदार वसंतराव झावरे पाटील यांच्या दादांनी त्यांच्या कार्यकाळात अनेक विकास कामे लोणी हवेलीमध्ये मार्गी लावली, असे मत सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केले. ते लोणी हवेली येथे बोलत होते.
लोणी हवेली येथे सुजितराव झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजुर करण्यात आलेल्या लोणी हवेली (कोल्हे वस्ती) येथील अंगणवाडी व (खडकवाडी) येथील सभागृहाचे भूमिपूजन जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजितराव झावरे पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले. या कार्यक्रम प्रसंगी वेळी सुप्याचे मा. उपसरपंच सागर मैड, स्वप्निल राहींज, चेअरमन शंकर महांडूळे, लोणी हवेलीचे मा. सरपंच सुभाष दुधाडे, ज्ञानदेव कोल्हे, चेअरमन रमेश कोल्हे, व्हा. चेअरमन दिपाली दुधाडे, ग्रामपंचायत सदस्य नवघणे, शिवाजीराव थोरे, शंकर कोल्हे, गोरख कोल्हे, शिक्षक नेते दादाभाऊ कोल्हे, संचालक राजेंद्र सोंडकर, दत्तात्राय दुधाडे, सोपान सोंडकर, बाळासाहेब हिंगडे, योगेश कोल्हे, गणेश कोल्हे, अशोक कोल्हे, कैलास सोंडकर, अप्पा दुधाडे, सागर हिंगडे, अंगणवाडी सेविका हांडे मॅडम, हिंगडे मॅडम, लोणेश्वर विद्यालयाचे लिपीक बापु कोल्हे, बंटी कोल्हे, चंदू कोल्हे व ग्रामस्थ मोठ्या संखेने उपस्थित होते.