Crime

साखरखेर्डा येथून ९ लिटर ताडी जप्त

सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – साखरखेर्डा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार नंदकिशोर काळे यांनी अवैध धंद्याविरुद्ध आक्रमक कारवाई सुरू केली असून, १ मे महाराष्ट्र दिनी गुप्त माहितीच्या आधारे वार्ड क्रमांक ६ मध्ये प्रोफेशन रेड केली असता आरोपी शेख युसूफ शेख यासीन वय ५६ वर्ष राहणार वार्ड क्रमांक सहा यांच्याकडे प्लास्टिकच्या मध्ये भरलेली ९ लिटर ताडी कॅन अंदाजे किंमत २७५० चा माल मिळून आला.

पोलीस कॉन्स्टेबल लक्ष्मण यांच्या तक्रारीवरून साखरखेर्डा पोलिस स्टेशनमध्ये आरोपी शेख युसूफ शेख यासीन यांच्यावर कलम ६५ (इ) (फ ) म दा का नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पुढील तपास ठाणेदार नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘पोलीस हेड कॉन्स्टेबल बाजीराव खरात हे करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!