आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील मुक्तादेवी शिक्षण प्रसारक मंडळ व पद्मावती देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल आळंदी येथील प्रशालेत महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात तसेच आळंदी पंचक्रोशीतील विविध ठिकाणी विविध उपक्रमांनी महाराष्ट्र दिन व कामगार दिन साजरा करण्यात आला.
यावेळी ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल मध्ये प्रथम भारत माता प्रतिमा पूजन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र घुंडरे यांनी केले. यावेळी आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या संचालिका कीर्ती घुंडरे, व्यवस्थापक विजय धादवड, मुख्याध्यापिका प्रीती उंबरकर, रश्मी संभे, अक्षय चपटे यांचेसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. येथील ज्ञानदीप इंग्लिश स्कूल महाराष्ट्र दिनानिमित्त नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर यांचे हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी नेचर फाउंडेशनचे अध्यक्ष भागवत काटकर यांचे हस्ते ध्वजपुजन करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष वैजिनाथ ठवरे, पूजा ठवरे, अश्विनी पाटील, पुष्पा अम्रे, सीमा ढोके, आशा पांचाळ, राम मुंडे, बालाजी केदार, विकास नेटके, कानिफनाथ महाराज शास्त्री, महादेव महाराज साधू आदी उपस्थित होते.
ध्यास प्रशालेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा
येथील ध्यास फाउंडेशन संचलित महर्षी वाल्मिकी विद्यावर्धिनी व महर्षी वाल्मिकी बालक मंदिर प्रशालेत जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा अशा जयघोषात ध्यास फाउंडेशनच्या वतीने प्रशालांच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. या प्रसंगी ध्यास फाउंडेशनचे व्यवस्थापक गोपाल उंबरकर, मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. त्या नंतर संस्थेचे व्यवस्थापक गोपाल उंबरकर यांचे हस्ते व प्रशालेच्या मुख्याध्यापिका अक्षता कुलकर्णी यांच्या उपस्थितीत प्रशालेच्या ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. प्रशालेच्या उपशिक्षिका आरती कुलकर्णी यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व महाराष्ट्र गीत गायन केले. यावेळी जयघोष करून महाराष्ट्र दिन सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. सूत्रसंचालन उपशिक्षिका स्मिता रंधवे यांनी केले.
ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत ‘महाराष्ट्र दिन व कामगार दिन’ साजरा
येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेत ‘महाराष्ट्र दिन व आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या’ निमित्ताने विद्यालयाचे पर्यवेक्षक अशोक बनकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व ज्येष्ठ लिपिका रोहिणी पवार यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय गीत, राज्य गीत व झेंडा गीतातून ध्वजाला वंदना देण्यात आली. संस्थेचे खजिनदार डॉ. दीपक पाटील यांचा वाढदिवस असल्याने त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. संस्थेचे सचिव अजित वडगावकर, दिपक मुंगसे, नारायण पिंगळे व सोमनाथ आल्हाट यांनी संस्था व प्रशालेच्या सर्व घटकांच्या वतीने डॉ. दीपक पाटील यांना उदंड व आरोग्यदायी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. या प्रसंगी उपप्राचार्य सूर्यकांत मुंगसे, पर्यवेक्षक किसन राठोड, प्रशांत सोनवणे, अनिता गावडे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक प्रदीप काळे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सर्व शिक्षकांना ‘महाराष्ट्र दिन व कामगार दिन’ या निमित्त संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.