Pachhim MaharashtraSOLAPUR

झेडपी मराठा सेवा संघातर्फे डॉ. आंबेडकर जयंतीनिमित्त भीमगीतांचा कार्यक्रम

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – सोलापूर जिल्हा परिषद मराठा सेवासंघ शाखेतर्पेâ चालू वर्षी राजमाता जिजाऊ जयंती, छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात जिल्हा परिषदेमध्ये साजरी करण्यात आली होती. त्याप्रमाणे यंदा महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती सुद्धा उत्साहात साजरी करण्यात येणार असून, भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

डॉ. आंबेडकर जयंतीनिमीत्त १४ एप्रिलरोजी घेणात येणार्‍या कार्यक्रमांचे नियोजन करणेसाठी आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यांत आला असल्याची माहिती मराठा सेवा संघाच्या जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी दिली. १४ एप्रिल रोजी सकाळी १० वा. यशवंतराव चव्हाण सभागृहामध्ये राज्य गीताचे गायन करून महामानव डॉ. आंबेडकर यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात येईल. मराठा सेवा संघ शाखा जिल्हा परिषद सोलापूर यांचेतर्पेâ जिल्हा परिषदेच्या यशवंतराव सभागृहामध्ये स्वानंद, टीचर्स् म्यूझिकल ग्रुप प्रस्तुत भीमगीतांचा कार्यक्रम होणार आहे. यामध्ये – रुपेश क्षीरसागर, श्रीमती किरणकुमारी गायकवाड, महेश कोटीवाले, आण्णा सुरवसे, आशा प्रक्षाळे व एकनाथ कुंभार आदी जिल्हा परिषद शिक्षकांचा कार्यक्रम आयोजित केला आहे.

याप्रसंगी सचिन चव्हाण, राम जगदाळे, अनिल जगताप, सचिन जाधव, सचिन साळुंखे, प्रकाश शेंडगे, सुभाष कदम, आप्पासाहेब भोसले, सुहास चेळेकर, सुर्यकांत मोहिते, विष्ठल मलपे, संतोष शिंदे, संजय पाटील , अजित देशमुख, महेश पाटील, नितीन जाधव, विशाल घोगरे, अनिल पाटील, भूषण काळे, संतोष शेळके, चेतन भोसले, प्रदिप सुपेकर, विकास भांगे, वासुदेव घाडगे, अविनाश भोसले, सुधाकर माने – देशमुख,राजु देशमुख, गणेश साळूंखे, सचिन पवार, उमेश खंडागळे, जयंत पाटील, महेंद्र माने, अभिजीत निचळ, ऋषिकेश जाधव, रवि पाटील, गोपाळ शिंदे, हरिभाऊ देशमुख, राहुल शिंदे, जीवन भोसले, नितीन पाटील, आनंद साठे, विष्णू पाटील, रोहीत घुले, विनायक कदम, सुनिता भुसारे, आश्विनी सातपुते, सोनाली कदम, सुचिता जाधव, ज्योत्न्सा साठे, उषा भोसले , अनुपमा पडवळे, भारती धुमाळ, अंजली पाटील, सविता मिसाळ, सोनल केत उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!