BULDHANAHead linesVidharbha

फिडे मानांकन राज्य बुद्धिबळ स्पर्धेत प्रतिभावंतांची कसोटी!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) –  येथील बुलढाणा जिल्हा चेस सर्कल, बुलढाणा अर्बन तथा सहकार विद्या मंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने बुलडाण्यात फिडे मानांकन राज्यस्तरीय अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा ही १४ ते १६ एप्रिल दरम्यान सहकार विद्या मंदिर सभागृह येथे घेण्यात येणार असल्याची माहिती बुलडाणा अर्बनचे सीएमडी तथा आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ. सुकेश झंवर यांनी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ही पत्रकार परिषद बुलडाणा रेसिडेन्सी येथे घेण्यात आली. पुढे माहिती देतांना डॉ. झंवर म्हणाले की, बुलडाण्यात होणारी राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा २०२३ , ही स्पर्धा बुलडाणा व ग्रामीण भागातील खेळाडूंना वाव मिळावा, प्रतिभावान खेळाडूंना नॅशनल पातळीवर सहज जाता यावे या उद्देशातून ठेवण्यात आलेली आहे.  सदर स्पर्धा ही खुली व अंडर १७ गटासाठी ठेवण्यात आलेली आहे. या स्पर्धेकरिता प्रत्येक जिल्ह्यातून खेळाडूंची निवड होऊन दोन युवक व दोन युवती अशा खेळाडूंना या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी केले जाणार आहे.  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची जन्मतारीख ही १ जानेवारी २००६ च्या नंतरची असने आवश्यक आहे.  या स्पर्धेचे समितीचे अध्यक्षपदी डॉ. सुकेश झंवर यांची निवड करण्यात आलेली आहे, तर समितीच्या सचिव पदी अंकुश रक्ताडे (सहसचिव महाराष्ट्र बुध्दिबळ संघटना) यांची निवड करण्यात आलेली आहे.  स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक खेळाडूंना प्रमाणपत्र व ट्राफी दिली जाणार आहे.  सदर स्पर्धेकरिता एकूण बक्षीस रोख रक्कम ३६ हजार ठेवण्यात आलेली आहे.  या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंची राहण्याची मोफत करण्यात आलेली आहे, तर जेवणाची व्यवस्था आयोजकाच्या वतीने नाममात्र शुल्कात करण्यात आलेली आहे.  तर खेळाडू सोबत येणाऱ्या पालकांना अतिशय माफक दरात राहण्याची जेवणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.  यामध्ये सकाळच्या चहा, नाश्ता, दुपारचे जेवण, रात्रीचे जेवणाचा समावेश करण्यात आला आहे.

सदर स्पर्धा ही आठ फेऱ्यांमध्ये घेण्यात येणार आहे. प्रत्येक फेरी ही ६० मिनिट ३० सेकंदाची असणार आहे. सदरची स्पर्धा स्विस लिग पध्दतीने घेण्यात येणार आहे.  स्पर्धेचे उद्घाटन १४ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता केले जाणार आहे तर बक्षीस वितरण १६ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता केले जाणार आहे.  तसेच इतर महितीकरिता ९४०५७७७७८४ वर संपर्क साधावा.  स्पर्धेचा लाभ जास्तीत जास्त खेळाडूंनी घ्यावा, असे आवाहन आयोजकाच्या वतीने करण्यात आलेले आहे.


ग्रँडमास्टर करणार मार्गदर्शन

बुलडाण्यात घेण्यात येणाऱ्या या राज्यस्तरीय राज्य अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेसाठी मार्गदर्शन व मुख्य आकर्षण म्हणून ग्रँडमास्टर अभिजीत कुंटे, ग्रँडमास्टर स्वप्निल धोपाडे हे असणार आहे.  तर या स्पर्धेकरीता अखिल भारतीय बुद्धिबळ फेडरेशनचे सल्लागार अशोक जैन तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके, स्पर्धेचे मुख्य पंच म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावरील पंच म्हणून कामगिरी केलेले प्रवीण ठाकरे यांना आमंत्रित करण्यात आलेले आहे.  सदर स्पर्धेकरिता महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सचिव यांना देखील आमंत्रित करण्यात आलेले आहे.


नॅशनल स्पर्धेसाठी होणार खेळाडूंची निवड

राज्यस्तरीय बुलढाणा येथे होत असलेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूंची निवड ही नॅशनल स्पर्धेसाठी केली जाणार आहे. सदर स्पर्धा ही मे महिन्यात १ ते ९ मे दरम्यान पंजाब मध्ये घेतली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!