ChikhaliVidharbha

बोरगाव काकडे येथील युवकाचा ट्रॅक्टरखाली दबून मृत्यू

चिखली (तालुका प्रतिनिधी) – अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या बोरगाव काकडे येथील एका २५ वर्षीय युवकाचा शेतात नांगरणी करत असताना, ट्रॅक्टर पलटी होऊन त्याखाली दबून चिरडून मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना दि. ४ एप्रिल रोजी सकाळी सात वाजता घडली.

चिखली तालुक्यातील बोरगाव काकडे येथील युवक सागर नारायण खंडागळे (वय २५) हा शेतात ट्रॅक्टरद्वारे नांगरणी करत असताना ट्रॅक्टर अचानक पलटी झाला. त्यात त्याला बचावाची कोणतीही संधी मिळाली नाही. तो ट्रॅक्टर खाली दबून व चिरडून जागीच मृत्युमुखी पडला. याप्रकरणी अमडापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सागर नारायण खंडागळे याचा पंचनामा करून सदर प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले. या प्रकरणाचा तपास ठाणेदार नागेश कुमार चतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली लक्षण टेकाळे हे करत आहे. सदर या घटनेमुळे बोरगाव काकडे या गावावर शोककळा पसरली आहे. तसेच, आता नांगरणीचे दिवस असल्याने शेतकर्‍यांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झालेली आहे.—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!