BULDHANACrime

मलकापूर एमआयडीसी पोलिसांचे अवैध दारूविक्रेत्यांविरोधात धाडसत्र, साडेआठ हजाराची देशी-विदेशी दारू जप्त

सिंदखेडराजा/बुलढाणा (सचिन खंडारे) – श्रीराम नवमीच्या पार्श्वभूमीवर मलकापूर एमआयडीसी पोलिसांनी धाडसत्र राबवून देशी-विदेशी दारूची अवैध विक्री उधळून लावली. श्रीराम नवमीच्या अनुषंगाने व बुलढाणा जिल्हा पोलिस दलातील अवैध धंदे कारवाई स्पेशल ड्राईव्ह दरम्यान ठाणेदार दुर्गेश राजपूत यांनी आज स्वतः पोलिस स्टाफसह जाऊन दसरखेड, तलास वाडा येथे अचानक छापे मारून दोन ठिकाणी दारूच्या केसेस केल्या आहेत.

त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची दारू ज्यात देशी ट्यांगो पंच, सखू संत्रा, संत्रा कोंकण अशी दारू. तसेच विदेशी दारू गोवा जिन, इम्पेरियल ब्लू, मॅक डोल व्हिस्की, ऑफिसर चॉईस, ओल्ड मंक इत्यादी प्रकारची दारू मिळून आली. ही दारू जप्त करून आरोपींवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. कारवाई झालेल्या आरोपींत अतुल भगवान पाटील रा. दसरखेड याच्याकडे ४८६० रुपयांची देशी, विदेशी दारू मिळून आली. तसेच संजय लक्ष्मण बाळापूरे रा. दसरखेड याच्याकडे ३७४० रुपयांची देशी, विदेशी दारू मिळून आली. अशा दोन आरोपींवर कारवाई करून एकूण ८६०० रुपयांचा मुद्देमाल मिळून आला आहे. सदर बाबत गुन्हे दाखल करण्यात आले असून, ही कारवाई ही पोलिस अधीक्षक सारंग आवाड, अतिरिक्त पोलिस अधीक्षक अशोक थोरात, एसडीपीओ मलकापूर अमोल कोळी, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या मार्गदर्शनाखली ठाणेदार दुर्गेश राजपूत, पोहे कॉ चोपडे, इंगळे, पो ना .वैदकर, पोकाँ काकड, मंगेश पाटील, चालक सावे, होमगार्ड शांताराम पाटील, घुये, चिकटे आदींनी केली आहे.
——————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!