BULDHANAHead linesMumbaiWorld update

आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी पोहण्याचा केला विक्रम

बुलढाणा (संजय निकाळजे) – बुलढाणा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश प्रसाद यांनी गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा लेणी असा पोहण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. त्यांनी ५ तास २५ मिनिटांत १६.२० किलोमीटरचे समुद्री अंतर पोहून पूर्ण केले. भारतीय जलतरणपटूंना प्रेरणा मिळावी, यासाठी कृष्णप्रकाश यांनी ही मोहीम हाती घेतले. विशेष म्हणजे, याआधी बर्‍याच लोकांनी एलिफंटा लेणी ते गेट वे ऑफ इंडिया असे समुद्री अंतर पोहून पूर्ण केले आहे. परंतु, कृष्णप्रकाश यांनी समुद्र लाटांविरोधात म्हणजेच गेट वे ऑफ इंडिया ते एलिफंटा असे अंतर पोहून पार करत, नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

आयपीएस अधिकारी कृष्णप्रकाश यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. ‘मी आज गेटवे इंडिया ते एलिफंटा लेणीपर्यंत पोहण्याचा काम पूर्ण करणारा जगातील पहिली व्यक्ती ठरलो. अनेकांनी एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने पोहण्याचा विक्रम केला आहे. परंतु, मी त्याविरुद्ध म्हणजेच गेट ऑफ इंडिया ते एलिफंटा या दिशेने पोहण्याचे ठरवले. मी ५ तास आणि २६ मिनिटांत १६.२० किलोमीटर पोहून पूर्ण केले. यामुळे भारतीय जलतरणपटूंना स्विमिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी प्रेरणा मिळेल, असा विश्वास कृष्णाप्रकाश यांनी व्यक्त केला आहे.

कृष्ण प्रकाश हे सध्या मुंबई येथे व्हीआयपी सेक्युरिटी आणि कोस्टल सेक्युरिटी, महाराष्ट्रचे विशेष पोलीस महानिरीक्षक या पदावर कार्यरत आहेत. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त म्हणून, बुलढाणा जिल्हा, अमरावती जिल्हा, अहमदनगर जिल्हा येथे पोलीस अधीक्षक म्हणूनही त्यांनी सेवा दिलेली आहे. या तीनही जिल्ह्यांत त्यांची कारकीर्द प्रचंड गाजलेली आहे. तसेच त्यांनी आपले नावावर विश्वपातळीवर अनेक विक्रम नोंदविले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!