BULDHANAHead linesMEHAKARVidharbha

मेहकरात चढतोय ‘इलेक्शन ज्वर’!

बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – जिल्ह्यात प्रतिष्ठेच्या समजल्या जाणार्‍या मेहकर कृषी उत्पन्न बाजार समिती निवड़णुकीचा ज्वर आता काहीसा चढत असून, आज २९ मार्चरोजी एकाच दिवशी सात उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.

जिल्ह्यातील मेहकर, बुलड़ाणा, खामगाव, चिखली, देऊळगावराजासह दहा कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवड़णूका घोषित झाल्या असून, २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. मेहकर बाजार समितीसाठी आज २९ मार्च रोजी सहकारी संस्था सर्वसाधारण मधून रामराव सखाराम चव्हाण, सह.संस्था इमाव मधून सुरेश काशीनाथ वानखेडे, अड़ते व व्यापारी मधून वसंतराव नथ्थूजी काळे, रवी हिम्मतराव जाधव, भारत बाजीराव गुड़धे, हमाल व मापारी मधून भुरीवाले हुशेन भुरान गवळी, कैलास लिंबाजी बंगाळे आदिंनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

लोणार बाजार समितीसाठी आज सह.संस्था सर्वसाधारण मधून कारभारी संभाजी सानप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तसेच बुलड़ाणा बाजार समितीसाठीसुध्दा आज एकाने उमेदवारी दाखल केली आहे. यापूर्वी म्हणजे गेल्या दोन दिवसातसुध्दा देऊळगाव राजा बाजार समितीसाठी एक, मेहकरसाठी तीन तर लोणार बाजार समितीसाठी सहा उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत. जसजशी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख जवळ येईल तसा उमेदवारी अर्जाचा ओघ वाढणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात सर्वात मोठी बाजार समिती खामगावसाठी आजसुध्दा एकही उमेदवारी दाखल नसल्याची माहिती आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!