Maharashtrapachod

मुरम्यातील गावठांणचे ट्रासफार्मरचे बॉक्स उघडेच

पाचोड/मुरमा ता.पैठण येथील गावठाणंचे ट्रासफार्मरचे बॉक्सचे झाकण गायब असून नूकताच आता पावसाळा लागला असल्यामुळे ही समस्या जीवघेण्या ठरू शकते. तसेच, विद्युत शॉकमुळे अपघातही होऊ शकतो. गेल्या आठ महिन्यापासून जास्त कालावधी पासून हा बाँक्स तशाच आवस्थेत आहे याबाबतीत ग्रामपंचायत सह महावितरण प्रशासनाने उघड्या बॉक्सला झाकण लावण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
        गावात विजपुरवठा सुरूळीत करणाऱ्या ट्रासफार्मरच्या बॉक्सची अवस्था बिकट झाली आहे. एवढेच नव्हे तर या ट्रासफार्मरच्या बॉक्सला कुलूपच लावण्यात आलेले नसल्याने ते उघडे आहेत. तर ट्रासफार्मरचे बॉक्स तारांनी बांधण्यात आले आहेत. या ठिकाणी लहान मुलांना खेळताना शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. उघड्या बॉक्समध्ये नागरिक स्वतःच जीव धोक्यात घालून वीज घेत असतात. परिणामी उघड्या अवस्थेतील धोकादायक बॉक्स त्यामुळे विद्युत शॉक बसू शकतो. त्यातच पावसाळा लागण्याची घटना सतत घडत असतात. तोंडावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने व महावितरण प्रशासनाने मान्सूनपूर्वची कामे करताना ही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना नाहीत तरी मुरम्यातील उघडे डीपी बॉक्स त्वरित कुलूप बंद करावे, अशी अनेकदा मागणी केली असल्याची नागरिकांचे म्हणणे आहे. परंतु अद्यापही ठोस कारवाई केली जात नसल्याचे दिसत आहे..
चौकट-धोकादायक ट्रासमार्फार बॉक्स उघड्या स्थितीत आहे. अनेक बॉक्स मुलांचा हात पोहोचेल एवढ्या उंचीचे असून, त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या ट्रासफार्मर त्वरित बंद करून संभाव्य धोका टाळावा.याकडे ग्रामपंचायत व महावितरण नेहमी डोळेझाक करतात..
ज्ञानेश्वर थावर- नागरिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!