Breaking newsMumbaiPolitical NewsPolitics

उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्री पदासह आमदारकीचाही राजीनामा

 

 

मुंबई – मला बहुमताचा खेळ खेळायचा नाही. ज्यांना शिवसेनाप्रमुखांनी आणि शिवसैनिकांनी मोठं केले. त्या शिवसेनाप्रमुखांच्या मुलाला मुख्यमंत्रिपदावरून खाली उतरवल्याने पुण्य मिळत असेल ते त्यांना मिळू द्या. हा आनंद कुणीही हिरावून घेऊ नये. मला मुख्यमंत्रिपद सोडण्याची इच्छा अजिबात नव्हती. मला खुर्चीला चिटकून बसायचं नाही. मी मुख्यमंत्रिपदाचा त्याग करतोय, त्याचसोबत विधान परिषदेच्या सदस्यत्वाचाही राजीनामा देतोय अशी घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकवरून केली.

 

औरंगाबादचं नामांतर करत असताना काँग्रेस-राष्ट्रवादीने विरोध न करता तातडीने मंजूर केली. त्यांचे आभार मानतो. आजपर्यंत ज्यांनी हे करायला हवं होतं त्यांनी केले नाही. ज्यांचा विरोध असल्याचं भासवलं गेले त्यांनी ठराव मंजूर करताना साथ दिली. ज्यांनी आपल्याला मोठं केले त्यांनाच विसरायचं. सत्ता आल्यावर ज्यांना भरपूर काही दिले ते नाराज झाले असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना लगावला.

 

उद्धव ठाकरे म्हणाले की, अनेक शिवसैनिक भेटले, गरीब, वयोवृद्ध ज्यांना काही दिले नाही ते खंबीर साथ देतायेत याला माणुसकी म्हणतात. सुप्रीम कोर्टाने आज बहुमत चाचणी देण्याचा निर्णय दिला. लोकशाहीचं पालन झालेच पाहिजे. दीड पावणे दोन वर्ष विधान परिषदेच्या १२ सदस्यांची यादी तातडीने मंजूर केली तर राज्यपालांबद्दल आदर आणखी वाढेल. जे दगा देतील असं सांगत होते ते सोबत होते. काँग्रेस बाहेरून पाठिंबा द्यायला तयार आहे. आपली नाराजी सूरत, गुवाहाटीला जाऊन सांगण्यापेक्षा वर्षा किंवा मातोश्री या हक्काच्या घरात येऊन सांगायचं होतं. तुमची नाराजी नेमकी काय आहे हे एकदा समोर बोलावं आजही मी हे बोलतोय असं त्यांनी सांगितले.

 

तसेच आज शिवसैनिकांना नोटीस पाठवली जाते. केंद्रीय सुरक्षा पथक मुंबईत दाखल होतेय. ज्या शिवसैनिकांनी आमदारांच्या विजयाचा गुलाल उधळला. त्यांच्या रक्ताने तुम्ही मुंबईचे रस्ते लाल करणार आहात का? उद्या कुणीही बंडखोर आमदारांचा रस्ता अडवू नका. नव्या लोकशाहीचा जन्म जल्लोषात झाला पाहिजे. तुमच्या मार्गात कुणीही आडवं येणार नाही. घ्या शपथ, बहुमत चाचणी फक्त डोकी मोजली जाणार आहे. कुणाकडे किती संख्या आहे ते बघणार यात मला रस नाही. माझ्याविरोधात एकही माझा माणूस राहिला तर माझ्यासाठी ते लज्जास्पद आहे असंही उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

 

*मी घाबरणारा नाही*

 

आम्ही हपालेले होऊन जात नाही. मुंबई हिंदुत्वासाठी झटतो. सगळ्या समोर मी मुख्यमंत्री पदाचा त्याग करतो आहे. मी घाबरणारा नाही. उद्या त्यांचा आनंद त्यांना पेढे खाऊ द्या मला शिवसैनिकांच्या प्रेमाचा गोडवा हवाय. वारकरी म्हणतात उध्दव ठाकरेंच्या हस्ते हवीय. माऊली म्हणतील ते मान्य. महाराष्ट्रात दंगल झाली नाही. मुस्लिमांनी पण ऐकले. मी आलोच अनपेक्षितपणे जातो पण तसाच आहे. नव्याने शिवसेना भवनात बसणार आहे. शिवसेना हिरावून घेऊ शकत नाही. सोबत विधान परिषद सदस्याचा पण राजीनामा. मी पुन्हा येईल अस बोललो नव्हतो. सर्वांचे शासकीस कर्मचारी सहकार्यांचे आभार मानतो असंही उद्धव ठाकरेंनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!