महाराष्ट्रात शिंदे-फडणवीसांच ठरलंय..! बुलडाणा जिल्ह्यातील डॉ.संजय कुटे कॅबिनेट तर श्वेताताई महाले पाटील यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागणार?
बुलडाणा(ब्रेकींग महाराष्ट्र) शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे एकनाथ शिंदे गटातील 39 आमदारांनी बंड पुकारले होते. अखेर प्लोर टेस्ट सिध्द करण्यासाठी राज्यपाल कोश्यारी यांनी ठाकरे सरकारला 30 जूनचा अल्टीमेटम देण्यात आला होता. याविरुध्द शिवसेना सर्वोच्च न्यायालयात गेली होते, परंतु तेथेही निराशाच पदरी पडल्याने अखेर उध्दव ठाकरे यांनी मुख्यमंत्री व विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने शिंदे-फडणवीसांचे सरकार बनविण्याचे स्वप्न पूर्ण होणार असून ते 1 जुलैला सरकार बनने जवळपास निश्चीत झाले आहे.
या घडामोडीत बुलडाणा जिल्हयातील जळगाव जामोदचे भाजपाचे माजी मंत्री आ.डॉ.संजय कुटे यांना कॅबिनेट मंत्री तर चिखली मतदार संघातील आमदार श्वेताताई महाले यांना राज्यमंत्री पदाची लॉटरी लागणार असून त्यांना महिला व बालकल्याण विभाग मिळण्याची शक्यता विश्वसनीय सुत्रांकडून मिळाली आहे. तर इतरांना मंत्रीपद मिळाले नाहीतर ते पुर्वीही आमदार होते व आमदाराच राहतील का? असा प्रश्न राजकीय वर्तूळात चर्चिला जात आहे. शिवसेनेतील बंडखोर आमदारांना 50 कोटी देण्यात आल्याची माहिती प्रसार माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस व एकनाथ शिंदे यांचे सरकार बनणे जवळपास निश्चीत झाले असून 1 किंवा 2 जुलैला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री पदाची शपथ देखील घेतील? याचा बुलडाणा जिल्हयाला फायदा होणार असून जळगाव जा. भाजपाचे माजी मंत्री डॉ.संजय कुटे यांना कॅबिनेट मंत्रीपद तर विदर्भातील एकमेव महिला आमदार श्वेताताई महाले पाटील यांची महिला व बालविकास मंत्रीपद मिळणार असल्याचे जवळपास निश्चीत झाले आहे. परंतु जिल्ह्यातील ज्या 2 शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली होती, त्यातील फडणवीस व शिंदे सरकारमध्ये कोणाला मंत्रीपदाची लॉटरी लागते की? फक्त आमदारकीवरच समाधान मानावे लागते हे पाहणे गरजेचे आहे.