MumbaiPolitical News

अखेर ‘त्या’ बंडखोरीचा मुख्यमंत्री ठाकरेंच्या राजीनाम्याने शेवट.. राज्यातील 82 टक्के शिवसैनिक उध्दव ठाकरेंसोबतच!

मुंबई(ब्रेकींग महाराष्ट्र)शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्यासोबत असलेली युती तोडून शिवसेनेने सत्तेतून बाहेर पडून शिवसेनेच्या मूळ हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपाशी युती करण्याबाबत सल्ला शिवसेना बंडखोर आमदारांच्यावतीने देण्यात आला होता. परंतु ते शक्य न झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासह जवळपास 39 आमदारानी बंडखोरी केली. अजुनही शिवसेना बंडखोर आमदार शिवसेना आमचीच असल्याचे सांगून बाळासाहेबांना श्रध्दास्थान मानतात. हिंदुत्वाच्या मुद्याला साथ देण्यासाठी अब्दुल सत्तार यांनी सुध्दा बंडखोरी केली आहे. तर महाविकास आघाडी सरकारमध्ये परत येण्यासाठी महाविकास आघाडीने शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु त्यांनी ती न स्वीकारल्यामुळे ते हिंदुत्वाच्या मुद्यावर ठाम असल्याचे सिध्द केले. 1 जुलैला शिंदे व फडणवीसांचे महाराष्ट्रामध्ये सरकार सुध्दा बनेल, बंडखोरांना मंत्रीपद सुध्दा मिळतील परंतु त्यांचे पुढील निवडणुकीत बाळासाहेबांचे सैनिक शिवसैनिक म्हणून स्वागत करतील का? की त्यांना पाठ दाखवुन त्यांचे राजकारण संपवितील, अशा प्रकारच्या चर्चा सुध्दा आता रंगू लागल्या आहेत.
          हिंदुह्दय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी हिंदुत्व व मराठी माणसांसाठी शिवसेनेची स्थापना केली हेाती. हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेने महाराष्ट्रामध्ये मोठी मुसंडी मारली आहे. शिवसेना वाढवून शिवसेनेने सर्वसामान्य माणसाला मुख्यमंत्रीपद व अनेकांकड मंत्रीपदाची जबाबदारी बाळासाहेबांनी सोपविली. परंतु काहींनी सत्ता उपभोगून काही कारणास्तव शिवसेनेला फारकत दिली. ज्यांनी शिवसेनेला फारकत दिली, त्यांचे इतर पक्षात पुनवर्सन सुध्दा झाले तर काहींना अस्तीत्वासाठी मोठा संघर्ष सुध्दा करावा लागला. बाळासाहेबांच्या शिवसेनेमुळे हिंदुत्वाच्या मुद्यावर महाराष्ट्रामध्ये भाजपाला अस्तीत्व मिळू लागले, एकंदरीत शिवसेनेचा हात धरुन भाजपा महाराष्ट्रामध्ये मोठी झाली. बाळासाहेब जो निर्णय एकदा घेत होते तो निर्णय काळ्या दगडावरची रेष असायची. मराठी मु्द्यावर बाळासाहेबांनी काँग्रेसच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार प्रतिभाताई पाटील सर्वात प्रथम पाठींबा दिला होता, त्यावेळी मित्रपक्ष भाजपा नाराज सुध्दा झाली होती.
          शिवसेनेचा महाराष्ट्रातील इतिहास व कार्य पाहता शिवसेनेने संघटीत हिंदु व मराठी माणसाला प्रथम स्थान देवून त्यांना जोडून त्यांच्या हक्कासाठी 80 टक्के समाजकारण व 20 टक्के राजकारण या मुद्यांवर शिवसेना मोठी केली. मराठी व हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेची अख्या मुंबईवर सत्ता आहे व ती त्याच मुद्यावर पुढे सुध्दा कायम राहणार आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे यांनी सन 2019 मध्ये भाजपाशी भिनसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची साथ घेवून महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करुन बाळासाहेबांच्या हिंदुत्वाच्या मुद्याला तिलांजली दिली. परंतु त्याला कारणही तेवढेच मोठे होते, जे भाजप शिवसेनेचा हात धरुन महाराष्ट्रामध्ये येवून मोठे झाले त्यांच्याकडून शिवसेनेला दुय्यम वागणूक मिळत होती, हे एक सत्य होते. कदाचीत बाळासाहेब असते तर त्यांनी भाजपाला फटकारले असते, परंतु उध्दव ठाकरे यांनी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत येवून सरकार स्थापन केले, हे बाळासाहेबांनी स्थापन केलेल्या शिवसेनेच्या शिवसैनिकांना पटणारे नव्हते. त्यामुळेच नाराजी वाढत गेली, आणी त्या नाराजीचा अडीच वर्षांनी एवढा मोठा स्फोट झाला की जून महिन्यात शिवसेनेचे 39 आमदारांनी शिवसेनेशी बंडखोरी करीत काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सोबत असलेली युती तोडण्यापर्यंत हिंमत केली, शिवसेनेने काँग्रेस व राकाँ.शी युती न तोडल्याने अखेर स्फोट होवून बहुमत सिध्द करण्याची पाळी ठाकरे सरकार यांच्यावर आल्याने उध्दव ठाकरे यांनी त्यापुर्वीच मुख्यमंत्री व विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला.
          बंडखोर आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर भाजपाशी जवळीक केली असून 1 जुलै रोजी शिंदे व फडणवीसांचे सरकार सुध्दा बनणार आहे. परंतु मुद्दा शिवसेना कुणाची, यापर्यंत येवून ठेपली असून बहुमताच्या आधारावर शिवसेना आमचीच असल्याचे सांगीत शिंदे शिवसेनेवर दावा ठोकणार असल्याचे चर्चा सुध्दा रंगल्या आहेत. परंतु एकनाथ शिंदे व उध्दव ठाकरे यांचे महाराष्ट्रात किती शिवसैनिक समर्थक आहेत. याचा सर्व्हे एका वृत्तवाहिनेने केला असून यामध्ये राज्यातील शिवसैनिकांनी उध्दव ठाकरेंना प्रथम पसंदी दिली आहे, हे विशेष!

असा आहे वृत्तवाहिनीचा सर्व्हे..
शिवसेनेच्या जवळपास 39 आमदारांनी हिंदुत्वाच्या मुद्यावर राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत असलेली युती तोडण्याची विनंती केली होती, परंतु ते शक्य न झाल्याने मोठी दरी निर्माण झाली. आता शुक्रवार 1 जुलै रोजी शिंदे व फडणवीस सरकार सुध्दा बनणार आहे. काही दिवसापुर्वी शिवसैनिक कोणाच्या पाठीमागे, याबाबत साम टिव्ही वृत्तवाहिनीने राज्याभरात केलेल्या सर्वेत उध्दव ठाकरेंना 82.4 टक्के लोकांनी पसंती दिली तर एकनाथ शिंदे 13.7 टक्के तर 3.9 टक्के शिवसैनिक पूढील राजकीय घडामोडी पाऊल उचलणार असल्याचे सांगितले. यामुळे शिवसेनेला फार मोठा फरक पडणार नसून 13.7 टक्के शिवसैनिक एकनाथ शिंदेंच्या पाठीमागे असल्याने त्यांचे वजन सुध्दा मोठे असून हे शिवसेनेसाठी चिंता वाढविणारी बाब आहे. भविष्यामध्ये बाळासाहेबांच्या शिवसेनेला राज्यातील शिवसैनिक साथ देतील यामुळे शिवसेनेचे अस्तीत्व कमी होणार नाही, असे या सर्वेतून स्पष्ट होते. परंतु शिवसेना पक्षावरच एकनाथ शिंदे दावा ठोकतात काय? भविष्यात शिवसेना कुणाची? हे ही पाहणे गरजेचे असणार आहे.

राजकारणात काहीही होवू शकते?
एकनाथ शिंदे यांची श्रध्देय बाळासाहेबांवर असलेली श्रध्दा व हिंदुत्वाचा मुद्दा तसेच बहुमताच्या आधारे शिवसेनेवर दावा ठोकणे हा पर्याय की, उध्दव ठाकरे यांनी राजीनामा देऊन राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसशी असलेली अनैसर्गीक मैत्री तोडल्याने एकनाथ शिंदे, उध्दव ठाकरे व देवेंद्र फडणवीस पुन्हा हिेंदुत्वाच्या मुद्यावर एकत्रीत येवून काही मार्ग काढतील का? जेणेकरुन राज्यातील शिवसैनिक एकजुट होतील. ही धुसर आशा असलीतरी राजकारणात केंव्हा काहीही होवू शकते, एवढे मात्र निश्चीत!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!