AalandiPachhim Maharashtra

भाजीमंडई स्थलांतरणासह विविध मागण्यांसाठी आळंदीत धरणे

आळंदी (अर्जुन मेदनकर) – येथील आळंदी ग्रामीण रुग्णालयाशेजारील भाजी मंडईचे तात्काळ स्थलांतर करण्यासह विविध मागण्यांसाठी आळंदी नागरपरिषदे समोर एक दिवशीय धरणे आंदोलन करून आळंदी नागपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात रिपब्लिकन सेना, दलित पँथर, वंचित बहुजन आघाडी, शिवसेना, सिद्धार्थ ग्रुप व समस्त आळंदी ग्रामस्थ यांचेवतीने एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले. तत्पूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आंदोलनकर्ते आळंदी नगरपरिषदे समोर विविध संस्थांचे माध्यमातून विविध मागण्यांसाठी धरणे आंदोलनास बसले. यावेळी विविध मागण्यांसह आळंदी नागपरिषद प्रशासनाच्या कामकाजाचा घोषणा देत निषेध करण्यात आला.

या आंदोलनात माजी नगराध्यक्ष रोहिदास तापकीर, पुणे जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना संदीप रंधवे, खेड तालुका दलीत पँथर अध्यक्ष रवींद्र रंधवे, रिपब्लिकन सेना पुणे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद गवई, शिवसेना संपर्क प्रमुख प्रसाद दिंडाळ,सामाजिक कार्यकर्ते चेतन कुर्‍हाडे, सिद्धार्थ ग्रुप उपाध्यक्ष विश्वजीत थोरात, अक्षय रंधवे, सुयोग कांबळे, रोहित रंधवे, निखिल रंधवे, संदीप रंधवे, राहुल रंधवे, भानुदास जाधव, अतुल रंधवे, मुन्ना रंधवे, रुपेश सोनवणे, ऋषिकेश सोनवणे, अजित थोरात, वैष्णवी रंधवे, राणी रंधवे आदींनी या आंदोलनात भाग घेऊन आंदोलान केले. आंदोलनकर्त्यांचे मागण्या मध्ये आळंदीतील ग्रामीण रुग्णालया शेजारील भाजी मंडईचे तात्काळ स्थलांतर करणे, स्मशानभुमी आणि विद्युत दाहीनी आळंदीतील नियोजित आरक्षित जागेत विकसित करणे, नगरपरिषदेने इनाम वर्ग ६ बच्या जागा बळजबरीने विना मोबदला ताब्यात घेतल्या आहेत त्या रिकाम्या करून देणे आदी मागण्यांचा समावेश आहे.

पुणे जिल्हा अध्यक्ष संदीप रंधवे, पुणे जिल्हा उपाध्यक्ष सदानंद गवई, पुणे जिल्हा युवक अध्यक्ष संदीप साळूंके, पुणे जिल्हा महिला अध्यक्षा भीमाताई तुळवे, पुणे शहर अध्यक्ष सचिन सुर्यवंशी, पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष अजय गायकवाड, खेड तालुका अध्यक्ष विशाल दिवे, खेड तालुका महिला अध्यक्षा आशा कुटे यांचे मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्याशी मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी संवाद साधला. ते म्हणाले, नगरपरिषदेत सध्या लोकप्रतिनिधींची (नगरसेवक) सर्वसाधारण सभा अस्तित्वात नसल्याने शहरातील धोरणात्मक निर्णय घेण्याचे सर्व अधिकारी सर्वसाधारण सभेचे अधिकार प्रशासक यांना आहेत. त्यामुळे भाजी मंडई स्थलांतराच्या विषयाशी तसेच इतर मागण्या विषयांशी संबंधित सर्व घटकांची बैठक घेण्याची मागणी खेड तहसीलदार तथा आळंदी नागपरिषद प्रशासक यांना निवेदना द्वारे करण्यात आली आले. यासाठी प्रशासकांना लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले आहे. या बैठकीत जो निर्णय होईल त्याची अंमबजावणी केली जाईल अशी ग्वाही मुख्याधिकारी कैलास केंद्रे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!