सिंदखेडराजा (सचिन खंडारे) – नवीन पेन्शन योजना रद्द करून सर्व कर्मचार्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी व इतर मागण्यांसाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, जिल्हा परिषद कर्मचारी महासंघ, महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन तसेच सर्व शासकीय शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हे दिनांक १४ मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संपावर जाणार आहेत, आणि या संपामध्ये सिंदखेडराजा तालुक्यातील सर्व ग्रामसेवकसुद्धा सहभागी होणार आहेत. याबाबत दिनांक १३ मार्च रोजी गटविकास अधिकारी यांना महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन शाखा सिंदखेडराजा यांच्यावतीने संपात सहभागी होण्याबाबत निवेदन देण्यात आले. त्यामुळे सिंदखेडराजा तालुक्यातील जवळपास सर्वच कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर जाणार असून त्यामुळे अनेक कामे रखडणार आहेत. त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसणार आहे.
————–
Leave a Reply