BULDHANAVidharbha

तहसीलदार, नायब तहसीलदार सामूहिक रजेवर, तहसीलचे कामकाज ठप्प!

– ग्रेड-पेमध्ये नायब तहसीलदारांवर घोर अन्याय, राज्यभर संतापाची लाट!

बुलढाणा (खास प्रतिनिधी) – राज्यातील महसूल विभागातील नायब तहसीलदार, राजपत्रित वर्ग-२ हे महत्वाचे पद आहे, परंतु नायब तहसीलदार या पदाचे वेतन राजपत्रित वर्ग -२ चे नसल्याने महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटना यांनी ग्रेड पे वाढविण्याच्या मागणीसाठी आज सामूहिक रजा आंदोलन केले. अधिकारी सुटीवर गेल्याने जिल्हाधिकारी कार्यालयात तसेच तहसीलस्तरावरील कामकाज प्रभावित झाले. सकाळी संघटनेच्यावतीने जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले, तर बर्‍याच कर्मचार्‍यांनी अमरावती येथे सुरू असलेल्या आंदोलनात सहभाग घेतला.

सन १९९८ पासून आजपर्यंत शासनाकडे वारंवार पाठपुरावा करुनही संघटनेच्या मागणीचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही, त्यामुळे नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग -२ यांचे ग्रेड पे ४८०० करण्यात यावे या प्रमुख मागणीसाठी आता संघटनेने आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. येत्या १३ मार्चला नैमित्तिक रजा तर ३ एप्रिलपासून काम बंद आंदोलनाचा इशारा देण्यात आला होता. आजच्या आंदोलनात महाराष्ट्रातील ८०० उपजिल्हाधिकारी, १५०० तहसीलदार, आणि जवळपास ४ हजार नायब तहसीलदार सहभागी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. यासंदर्भात संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी बुलढाणा जिल्हा प्रशासनाला आपल्या मागणीचे निवेदन दिले. निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गीते यांनी ते स्वीकारले. उपविभागीय अधिकारी- वैशाली देवकर, गणेश राठोड, राजेश्वर हांडे, मनोज देशमुख, तहसीलदार-श्यामला खेत, सैपन नदाफ, आर.यु.सुरडकर, सारीका भगत, डॉ. अजितकुमार येळे, श्याम धनमने, रुपेश खंडारे, संजय गरकल, सुनिल सावंत, अश्विनी जाधव, समाधान सोनवणे, राहुल तायडे, प्रिया सुळे, अनिल माचेवाड, नायब तहसीलदार-भांबळे, के.व्ही.पाटील, प्रमोद करे, हेमंत पाटील, कल्याण काळदाते, देवेंद्र कुर्‍हे, अ.वा.पवार, सातपुते, सुनिल अहेर, विजय पाटील, प्रकाश डब्बे, बी.एस.किटे, मुरली गायकवाड आदी अधिकारी आंदोलनात सहभागी झाले.
—————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!