आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री भैरवनाथ महाराजांच्या वार्षिकोत्सवा मंगळवारी ( दि. २१ ) भव्य बैलगाडा शर्यती उत्साहात पार पडल्या. यावर्षी २०९ टोकं देण्यात आले होते. यात आळंदी पंचक्रोशीतील नामवंत मालकांचे बैलगाडे चित्त थरारकपणे धावले. विजेत्या स्पर्धक गाडा मालकांना जाहीर केल्या प्रमाणे रोख व वैयक्तिक बक्षिसे आळंदी ग्रामस्थ आणि श्री भैरवनाथ महाराज उत्सव कमिटीचे वतीने वाटप करण्यात आल्याचे कमेटीचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील यांनी सांगितले.
श्रींचे उत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम परंपरेने झाले. यात सोमवारी ( दि. २० ) संदल मिरवणूक मोठ्या उत्साहात धार्मिक परंपरांचे पालन करीत रात्री उशिरा झाली. यात शहरातील सर्व ग्रामदेवतांची पूजा करण्यात आली. यावेळी बाउंसर्स ची चर्चा रंगली. प्रथमच उत्सव दरम्यान बाउंसर्स ला बोलविण्यात आल्याने एकच चर्चा रंगल्याचे सामाजिक कार्यकर्ते विलास कुऱ्हाडे पाटील यांनी सांगितले. उत्सवात बैलगाडा शर्यतीचे पाझर तलाव येथे लक्षवेधी बैलगाडा घाट तयार करून शर्यतींचे आयोजन करण्यात आले होते. बैलगाडा शर्यती पाहण्यास परिसरातून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती. आळंदी ग्रामस्थानी परिश्रम पूर्वक घाटाची निर्मिती केली होती. आळंदी घाट परिसरात लक्षवेधी ठरला. उत्सवात श्री भैरवनाथ मंदिरात काळ भैरवनाथ यज्ञ सोहळा, अभिषेख, हारतुरे, मांडव डहाळे, गावकरी भजन, श्रींचा छबिना पालखी मिरवणूक आदी कार्यक्रमांचे उत्साहात आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी उत्सवात मागील वर्षीचा नियोजित कार्यक्रम कोरोना काळात केलेल्या कार्याचा गौरव तसेच विविध क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल गुणवंतांचा सत्कार करण्यात येणार असल्याचे ज्ञानेश्वर घुंडरे पाटील यांनी दिली.
आळंदी बैलगाडा शर्यतीत शासनाने केलेल्या सूचना व निर्बंध यांचे पालन करीत शर्यती मोठ्या उत्साहात पार पडल्याचे प्रकाशशेठ घुंडरे पाटील यांनी सांगितले. आळंदीतील नागरिक, बैलगाडा मालक, चाहते यांनी आपली उत्स्फूर्त हजेरी लावत शर्यती पाहण्यास गर्दी केल्याचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे पाटील यांनी सांगितले. जिल्ह्यातील नामांकित बैलगाडा मालक, शेतकरी बांधव, हितचिंतक व नातेवाईक सहभागी झाले होते. बैलगाडा शर्यतीचे टोकन भैरवनाथ महाराज मंदिरात काढण्यात आले होते. यासही मोठा प्रतिसाद मिळाल्याने गाडे मालकांचे ज्ञानेश्वर उर्फ माऊली घुंडरे पाटील यांनी आभार व्यक्त केले. आळंदी उत्सव निमित्त आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे, वाहतूक पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांचे सर्व सहकारी यांनी बैलगाडा शर्यतींसाठी सहकार्य केले.
श्री भैरवनाथ महाराजांचे मंदिर, श्री शितळादेवी गणेश मंदिर , हजेरी मारुती मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंडप रोषणाईने मंदिर परिसराला वैभव प्राप्त झाले होते. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाईसह कमानी लक्षवेधी राहिल्या. आळंदी भैरवनाथ चौकात बैल गाडा शर्यतींचे विजेते यांना आळंदी ग्रामस्थ, उत्सव कमेटी आणि वैयक्तिक बक्षिसे देणारे मान्यवर यांचे हस्ते पारितोषिके वाटप करण्यात आली. पारितोषिकांत रोख रक्कम, जुंपता गाडा, दुचाकी, स्मार्ट टीव्ही, फ्रीज, कुलर, टेबल फॅन, भव्य चषक अशा विविध वैयक्तिय बक्षिसांचे वाटप झाले. चांदीची ढाल, गदा देखील देण्यात आली. मनोरंजनाच्या कार्यक्रमासह गुणवंतांचा सन्मान करून बुधवारी ( दि. २२ ) उत्सवाची सांगत होणार असल्याचे अध्यक्ष शंकरराव कुऱ्हाडे यांनी सांगितले. मंदिरात परंपरेने धार्मिक कार्यक्रम क्षेत्रोपाध्ये श्रींचे पुजारी वाघमारे बंधू परिवार यांनी नियोजन केले. भाविकांना कमी वेळेत दर्शन व्यवस्था करण्यात आली. आळंदीकर ग्रामस्थानी श्रींचे मंदिरात दर्शन तसेच नारळ वाढविण्यास गर्दी केली होती. यावेळी सुरेश दौडकर यांनी निधी संकलनास सहकार्य केले. बैलगाडा शर्यतींचे आयोजनात आळंदीतील उत्सव कमेटीसह ग्रामस्थ व युवक तरुण संजय भोसले, तन्मय भोसले, रोहित भोसले, संतोष तुळशीराम भोसले, माजी नगरसेवक आदित्यराजे घुंडरे पाटील, तुषारशेठ घुंडरे पाटील, प्रकाशशेठ घुंडरे पाटील, मयूर कुऱ्हाडे, योगेश कुऱ्हाडे, कार्तिक कुऱ्हाडे, सार्थक कुऱ्हाडे, ज्ञानोबा वहिले, पै. शिवाजीराव रानवडे, पदमराज रानवडे, सागरशेठ रानवडे, अक्षय रंधवे पाटील आदी युवक तरुणांनी परिश्रम घेतले.