सोलापूर (प्रतिनिधी) – दक्षिण सोलापूर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्था, मर्यादित, मंद्रुपच्या मासिक मिटींगमध्ये पतसंस्थेचे चेअरमन राजकुमार बिज्जरगी यांच्या अध्यक्षतेखाली आणि तालुकाध्यक्ष सतीश वाले, सरचिटणीस महिबूबसाब सवार, जेष्ठ नेते शिवाजी पाटील, जिल्हा प्रवक्ते बालाजी गुरव यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत सर्वानुमते सुभाष फुलारी आणि शिवानंद बिदर कोटेसू यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ही निवड करताना चेअरमन राजकुमार बिज्जरगी आणि व्हाइस चेअरमन विनोद कोळी यांनी संस्थेच्या स्वच्छ व पारदर्शी कारभाराविषयी माहिती दिली. सदर संस्था ही दक्षिण सोलापूर तालुक्यातील अग्रगण्य व विश्वासार्ह संस्था असल्याचे यावेळी सांगितले. तसेच शिवाजी पाटील, सतीश वाले , बालाजी गुरव, अंबण्णा वाघमारे यांनी आपल्या भाषणातून संस्थेच्या स्वच्छ कारभाराविषयी समाधान व्यक्त केले.
यावेळी जेष्ठ नेते तथा मंद्रुप सोसायटी संचालक शिवाजी पाटील, तालुका अध्यक्ष सतीश वाले, जिल्हा प्रवक्ते बालाजी गुरव, सरचिटणीस महिबूबसाब सवार , अंबण्णा वाघमारे, बिरु वाघमारे, सुनील बिराजदार, शिवानंद बिदरकोटे, सुभाष फुलारी,शांताप्पा कांबळे,शिवशरण म्हेत्रे,रेखा स्वामी, दयानंद वठारे, भीमराव पाटील, संजय देवकते , पिरप्पा हडपद इ. संस्थेचे संचालक व पदाधिकारी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवाजी पाटील यांनी केले तर प्रास्ताविक अध्यक्ष सतीश वाले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस महिबुबसाब सवार यांनी केले. तर आभार विनोद कोळी यांनी मानले.