BuldanaPolitical News

महाराष्ट्रासह बुलडाणा जिल्हयातील शिवसैनिक कोणासोबत? उध्दव ठाकरे साहेबांसोबतच, मात्र विरोध कुठेच नाही!

बुलडाणा- शिवसेना पक्षातील पक्षातंर्गत वाद चव्हाट्यावर आला असून मुख्यमत्री उध्दव ठाकरे यांच्यावर शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे वरचढ ठरल्याने शिवसेनेचे नेते खा.संजय राऊत यांचे जास्तीत जास्त काय होईल, राज्यातील सरकार पडेल अशी प्रतिक्रीया परत आज दुसऱ्यांदा दिल्याने महाविकास आघाडी सरकार अल्पमतात असल्याची भिती त्यांनी एकप्रकारे आज रोजी व्यक्त केली. तर काल रात्रीच्या दरम्यान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे शासकीय निवासस्थान वर्षावरुन ते मातोश्रीवर गेल्याने त्यांनी एकप्रकारे हार मानल्याची चर्चा सर्वीकडे रंगत आहे. गुरुवार 23 जून रोजी एकनाथ शिंदे गटातील संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री यांना लिहलेल्या पत्रात गंभीर आरोप केले आहे. सदर पत्र एकनाथ शिंदे यांच्या व्टीटर हॅण्डवर प्रसिध्द करुन खळबळ उडवून देवून मुख्यमंत्री यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. बुलडाणा जिल्हा शिवसेना प्रमुख जालींधर बुधवत म्हणतात जिल्ह्यातील शिवसैनिक उध्दवजीसोबतच आहे. जर जिल्ह्यातील शिवसैनिक उध्दवजींसोबत आहे, मात्र त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या शिवसेना आमदार विरोधात दंड थोपटले नसल्याने शिवसेना काँग्रेस व राष्ट्रवादीसोबत राहिल्याने शांत झाली काय? खरे हिंदूत्व विरसली का? असा प्रश्न सच्च्या शिवसैनिकांकडून उपस्थित केल्या जात आहे.
              महाविकास आघाडी सरकार पडेल की, त्याला तारल्या जाईल यावर संपूर्ण राज्यासह इतर राज्यात जोरदार चर्चा रंगली असून शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांच्या गोटातील आमदार प्रथम सूरत तर आता गुवाहाटी येथील एका हॉटेलमध्ये असून त्यांच्याकडे शिवसेनेचे 37 व इतर 9 असे एकूण 46 आमदारांचे समर्थन दावा एकनाथ शिंदे यांच्याकडून केल्या जात आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरदचंद्र पवार यांनी बागी आमदारांवर कारवाईचा बडगा उचलण्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना सांगितले आहे. तर दुसरीकडे संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून एक लेटरबॉम्बच फोडला आहे. सर्व घडामोडी घडतांना एकनाथ शिंदे यांना शिवसेनेसह इतर आमदारांचा पाठींबा मिळत आहे, तर ज्या शिवसेनेच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण मुंबई बंद व्हायची, मात्र आज बाळासाहेबांच्या शिवसेना स्थापनेचा हिंदुत्वाचा खरा मुद्या घेवून जात असलेल्या शिवसेनेच्या 37 आमदारांनी बंड पुकारुन हिंदुत्वाचा मुद्या पुढे नेत असल्यामुळेच शिवसैनिक शांत आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित होत आहे.

शिवसेनेच्या नाराज आमदारांची खदखद
आज 23 जून रोजी एकनाथ शिंदे यांच्या व्टीटर हॅण्डलवरुन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, उध्दवजी ठाकरे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र आमचा विठ्ठल हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे साहेबांना वंदन, काल वर्षा बंगल्याची दारं खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी उघडली. बंगल्यावर झालेली गर्दी पाहून आनंद झाला. ही दौरे गेली अडीच वर्ष शिवसेनेचे आमदार म्हणून आमच्यासाठी वंदनीय होती. आमदार म्हणून बंगल्यात प्रवेशासाठी आम्हाला तुमच्या आजूबाजूला असलेल्या, लोकांमधून निवडून न येणाऱ्या, विधान परिषद आणि राज्यसभेत आमच्या जीवावर जाणाऱ्या बडव्यांची मनधरणी करायला लागत होती. (चाणक्य कारकून) बडवे आम्हाला डावलून राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीची रणनिती ठरवत होते. त्याचा निकाल काय लागला ते अवघ्या महाराष्ट्राने पाहिले आहे.

शिवसैनिकांना का डावलण्यात आले?
शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना स्वपक्षीय आमदार म्हणून वर्षा बंगल्यात कधीही थेट प्रवेश मिळाला नाही. मंत्रालयात सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री सर्वांना भेटतात पण तुम्ही मंत्रालयात कधी गेलाच नाही. मतदार संघातील कामांसाठी, इतर प्रश्नांसाठी, वैयक्तिक अडचणींसाठी सीएम साहेबांना भेटायचे आहे, अशी अनेकवेळा विनवणी केल्यानंतर वर्षा बंगल्यावर तुम्हाला बोलवलंय असा निरोप वडव्यांकडून यायचा पण तासनतास बंगल्याच्या गेटवर उभं ठेवलं जायचं. वडव्यांना अनेकवेळा फोन केला तर बडवे फोन रिसिव्ह करत नसायचे. शेवटी कंटाळून आम्ही निघून जायचो. तीन ते चार लाख मतदारांमधून निवडून स्वपक्षीय आमदारांना अशी अपमानास्पद वागणूक दिल्याचा सवाल उपस्थित केला आहे. आम्ही अपमान सहन केला. आमदारांची आमची व्यथा, आपल्या आजूबाजूचे बडव्यांनी ऐकून घेण्याची कधी तसदीही घेतली नाही, किंबहुना आपल्यापर्यंत ती पोहोचवली सुद्धा जात नव्हती. मात्र याचवेळी आम्हाला आदरणीय एकनाथ शिंदे यांचा दरवाजा उघडा होता. तसेच मतदार संघात असलेली वाईट परिस्थिती, मतदार संघातील निधी, अधिकारी वर्ग, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून होत असलेला अपमान फक्त शिंदे साहेबच ऐकून घेत होते. आणी त्यातून सकारात्मक मार्ग काढीत होते. आमच्या सर्व आमदारांच्या न्याय हक्कासाठी सर्व आमदारांच्या आग्रहाखातर एकनाथ शिंदे यांना आम्ही निर्णय घ्यायला लावल्याचा उल्लेख पत्रात केला आहे.

हिंदूत्व मुद्दाला काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे हरताळ का?
हिंदुत्व, अयोध्या, राममंदीर हे मुद्दे शिवसेनेचे आहेत ना? मग आता आदित्य ठाकरे अयोध्येला गेले तेंव्हा आम्हाला अयोध्येला जाण्यापासून तुम्ही का रोखलं? तुम्ही स्वत: फोन करुन अनेक आमदारांना अयोध्येला जाऊ नका, असे सांगितले. मुंबई विमानतळावरून अयोध्येला निघालेल्या मी आणि माझ्या अनेक सहकाऱ्यांचे लगेज चेक इन झाले होते, आम्ही विमानात वसणार इतक्यात तुम्ही शिंदे साहेबांना फोन करून सांगितले की आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका आणि जे गेलेत त्यांना तुम्ही स्वत: परत घेऊन या. शिंदे साहेबांनी आम्हाला लगेच सांगितले की सीएम साहेबांचा फोन आला होता आमदारांना अयोध्येला जाऊ देऊ नका. आम्ही मुंबई विमानतळावर चेक इन केलेले लगेज परत घेतले आणि आपले घर गाठले. राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे एकही मत फुटले नव्हते मग विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर आमच्यावर इतका अविश्वास का दाखवला? आम्हाला रामलल्लांचं दर्‌शन का घेऊ दिले नाही? साहेव, जेंव्हा आम्हाला वर्षावर प्रवेश मिळत नव्हता तेंव्हा आमचे खरे विरोधक काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक तुम्हाला नियमित भेटत होते, मतदार संघातली कामं करत होते. निधी मिळाल्याची पत्र नाचवत होते. भुमीपुजन आणि उद्घाटन करत होते, तुमच्यासोबत काढलेले फोटो सोशल मिडियावर व्हायरल करत होते. त्यावेळी आमच्या मतदार संघातले लोक विचारायचे की मुख्यमंत्री आपला आहे ना मग आपल्या विरोधकांना निधी कसा मिळतो? त्यांची कामं कशी होतात? हे विचारीत हेाते. त्यावेळी मतदारांना उत्तर देतांना जीव कासाविस होत होता.

बाळासाहेबांचे हिंदूत्व जोपासणारे एकनाथ शिंदे भेटले
धर्मवीर आनंद दिघे साहेवांचं हिदुत्व जपणाऱ्या एकनाथ शिंदे साहेबांनी आम्हाला मोलाची साथ दिली. आमच्या प्रत्येक कठिण प्रसगांत त्यांच्या घराचे दरवाजे आमच्यासाठी उघडे होते, आजही आहेत आणि उद्याची राहतील. या विश्वासापोटी आम्ही शिंदे साहेबांसोबत असल्याचे पत्र देवून उध्दव ठाकरे यांनी 22 जून रोजी फेसबूकवर लाईव्ह वरुन केलेल्या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे समर्थकांनी एक उत्तरच दिलेले आहे. आता पुढे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे कोणती चाणक्य रणनिती आखतात, तर एकनाथ शिंदे कोणता निर्णय घेतात, हे ही पाहणे गरजेचे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!