बुलडाणा(जिल्हा प्रतिनिधी) राहुल मुळे यांचे पार्थिव २१ जून रोजी जम्मू काश्मीर येथून बुलडाणा येथे आणले. जिल्ह्यातील आसलगाव येथे आणल्या आणल्यानंतर नागरिकांनी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेवून शासकीय इतमामात त्यांचे अंतिम संस्कार करण्यात आले.
भारतमातेचे जवान राहुल मुळे (वय ३३) हे गेल्या ६ वर्षांपासून सीआयएसएफ दाखल झाले होते. अतिशय हिंमतीने भारतमातेचे रक्षण त्यांनी केले. छत्तीrसगड, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल यासह विविध राज्यात त्यांनी सेवा दिली. २० जून रोजी ते जम्मू काश्मीर येथे कर्तव्यावर असतांना त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यावेळी उपचार सुरु असतांना त्यांना मृत्यूने कवटाळले. त्यांच्या निधन झाल्याची वार्ता नातेवाईकांना व गावकNयांना मिळाल्यानंतर पूर्ण गावात शोककळा पसरली. त्यांचे पार्थव २१ जून रोजी जम्मू काश्मीर येथून दिल्ली येथे आणले.त्यानंतर औरंगाबाद येथून त्यांच्या मूळगावी आसलगाव येथे आणले. त्यांच्या अंत्यविधी कार्यक्रमास आसलगावचे सरपंच सुनिल डिवरे, उपसरपंच गणेश गिऱ्हे व गावातील सामाजिक कार्यकर्ते विजय तिवारी, राष्ट्रवादीचे प्रकाश ढोकने, प्रसेनजीत पाटील, सुनील येनकर, नायब तहसीलदार, पोस्टे.चे कर्मचारीवृंद, ग्रा.पं. सदस्य, सामाजिक कार्यकर्ते सर्व गावकरी मंडळी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.
Leave a Reply