Breaking newsBuldanaBULDHANAJalgaon JamodVidharbha

जिल्ह्यांत जिजाऊंच्याच लेकी अव्वल!

– इयत्ता दहावीच्या परीक्षेत ३९,९८२ पैकी ३८,१२७ विद्यार्थी, विद्यार्थिनी उत्तीर्ण
– बाहेरून परीक्षा देणारे सारे मात्र ‘ढ’ च!

बुलढाणा (बाळू वानखेडे) – राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल काल, २७ मेरोजी ऑनलाईन जाहीर केला. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातून जिजाऊंच्या लेकींनीच अर्थात मुलींनीच बाजी मारल्याचे दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्याचा इयत्ता दहावीचा निकाल ९५.३६ टक्के लागला आहे. जिल्ह्यातून या परीक्षेला ३९ हजार ९८२ विद्यार्थी, विद्यार्थिनी बसले होते .पैकी ३८ हजार १८३ विद्यार्थी, विद्यार्थिनी उत्तीर्ण झाले आहेत, अशी माहिती शिक्षणाधिकारी (माध्यमिक) अनिल आकाळ यांनी दिली. विशेष म्हणजे, तेराही तालुक्यांत जिजाऊंच्या लेकींचीच सरशी ठरली आहे. आयसोलेटेड (बाहेरून बसलेले) परीक्षार्थी सर्वच ‘ढ’ निघाले असून, एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही. विशेष म्हणजे, खामगाव व मेहकर तालुक्याचा निकाल सारखाच (९६.५२) असल्याचे दिसून येते.

राज्य शिक्षण मंडळाने इयत्ता दहावीचा निकाल काल, २७ मे रोजी जाहीर केला. जिल्ह्यातून इयत्ता बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारलेली असताना दहावीच्या परीक्षेतही मुलीच सरस ठरल्या आहेत. जिल्ह्यातून २१ हजार ९२६ मुले तर १८ हजार ०५६ मुलींनी इयत्ता दहावीची परीक्षा दिली होती. पैकी २० हजार ६०९ मुले तर १७ हजार ५१८ मुली उत्तीर्ण झाल्या. खाजगी ८६ मुले व ९४ मुली परीक्षेला बसले होते. पैकी ६९ मुले व ९० मुली पास झाल्या. बाह्यपरीक्षार्थी म्हणून ७० मुले व २७ मुलींनी परीक्षा दिली, त्यापैकी एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही. तेराही तालुक्यात जिजाऊंच्या लेकींची सरशी ठरली असून, बुलढाणा तालुक्यातून २८१६ मुले व २१३६ मुलींनी परीक्षा दिली होती, यापैकी २६३८ मुले व २०६८ मली उत्तीर्ण झाल्या. मोताळा तालुक्यातील ११४५ मुले तर ९९० मुलींनी परीक्षा दिली, यापैकी १०८५ मुले तर ९७८ मुली उत्तीर्ण झाल्या. चिखली तालुक्यातील २५५५ मुले तर २१०९ मुली परीक्षेला बसल्या होत्या. यापैकी २४६१ मुले व २०५९ मुली पास झाल्या. देऊळगावराजा तालुक्यातील १३४५ मुले व ९२७ मुली पैकी १२८५ मुले व ९०७ मुली उत्तीर्ण झाल्या. सिंदखेडराजा तालुक्यातून १५०८ मुले व १२१६ मुलींपैकी १४६८ मुले व १२०५ मुली उत्तीर्ण झाले. लोणार तालुक्यातील १४०७ मुले व १०१५ मुलींपैकी १३३७ मुले व ९८९ मुली पास झाल्या. मेहकर तालुक्यातून २५५० मुले व १९३३ मुलींपैकी २४४० मुले व १८८७ मुली पास झाल्या. खामगाव तालुक्यातूनही २५५० मुले व १९३३ मुलींपैकी २४४० मुले व १८८७ मुली पास झाल्या. शेगाव तालुक्यातून १३२३ मुले व १२३२ मुली पैकी १२४१ मुले व ११९२ मुली उत्तीर्ण झाले. नांदुरा तालुक्यातील १३०० मुले तर १२०२ मुलींपैकी ११५५ मुले व ११४० मुली उत्तीर्ण झाल्या. मलकापूर तालुक्यातील १३७७ मुले व १२५१ मुलींपैकी १२८६ मुले व १२१० मुली पास झाले. जळगाव जामोद तालुक्यातील १२६२ मुले व १०५८ मुलींपैकी ११६२ मुले व १००० मुली पास झाल्या. तर संग्रामपूर तालुक्यातील ९२३ मुले व ७७७ मुलींपैकी ८२३ मुले व ७४३ मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मेहकर व खामगाव तालुक्याचा निकाल सारखाच (९६.५२) लागला असून, येथील परीक्षार्थीची संख्याही सारखीच असल्याचे दिसून येते.

देऊळगाव साखरशा येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९६ टक्के, सरस्वती आश्रम शाळेचा निकालही ९०.२४ टक्के!

मेहकर तालुक्यातील देऊळगाव साखरशा येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९६ टक्के लागला असून, अनुष्का भीमराव पवार ९४ टक्के गुण घेऊन केंद्रातून प्रथम आली आहे. अमोल प्रमोद ढवळे ९२ टक्के गुण घेऊन दुसरा तर शे. आलिया महेमूद ९०.४० गुणाने तृतीय आली आहे. येथील सरस्वती आश्रम शाळेचा निकालही ९०.२४ टक्के लागला असून, ४१ पैकी ३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये श्रीकांत मुलचंद राठोड ८३ टक्के प्रथम, सुमित विनोद राठोड ७२.४० द्वितीय तर तुषार कैलास राठोड ६९ टक्के गुणाने तृतीय आला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांचे शिक्षण संस्था पदाधिकारी, प्रभारी मुख्याध्यापक धीरज पाटील, वर्ग शिक्षक सुनील पाचपोरसह शिक्षक वृंदांनी कौतुक केले. आश्रम शाळा मुख्याध्यापक शंकरराव परिहार, मुख्याध्यापक गोपाल होणे, शिक्षक देवकते, शेषराव वानखेडे, सह शिक्षक वृंद व कर्मचारी यांनी प्रावीण्यप्राप्त विद्यार्थ्यांचा घरी जाऊन सत्कार केला. यावेळी विद्यार्थ्यांचे पालकदेखील उपस्थित होते.


कै. भास्कररावजी शिंगणे हायस्कूल मंडपगावचे ४० पैकी ३९ विद्यार्थी उत्तीर्ण!

मंडपगाव-चिंचखेड येथील कै भास्कररावजी शिंगणे हायस्कूलचे ४० पैकी ३९ विद्यार्थी दहावी परीक्षेत उत्तीर्ण झाले असून, त्यात प्राविण्यश्रेणी २७, प्रथम श्रेणी ०८, द्वितीय श्रेणी ०३, तृतीय श्रेणी एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. कु.साक्षी बाबुराव काकड (८८ टक्के) प्रथम तर कु.अदिती रामदास देशमुख (८७.८० टक्के) द्वितीय, तर कु.रोशनी मनोहर असोले (८७ टक्के) गुण घेऊन शाळेतून तृतीय आली आहे. मिसाळवाडी गावाचे सुपुत्र तथा आदर्श मुख्याध्यापक शिवश्री प्रवीण मिसाळ हे या शाळेवर मुख्याध्यापक असून, त्यांच्या नेतृत्वात शिक्षकांनी घेतलेल्या कष्टाने विद्यार्थ्यांनी हे घवघवीत यश संपादन केलेले आहे. या यशाबद्दल संस्थाचालकांसह मान्यवरांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक केलेले आहे.
————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!