CrimeMEHAKARVidharbha

निर्घृण खुनाने मेहकर हादरले; जानेफळ रस्त्यावर धारदार शस्त्राने सपासप वार!

कोल्ड माइंड मर्डर, धमकी देऊन केला निर्घृण खून!

मेहकर (विशेष प्रतिनिधी) – शहरातील माळीपेठ येथील आकाश राजू  नन्नवरे (वय 22) या युवकाची जानेफळ रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. ही थरारक घटना २७ मे रोजी रात्री घडली. या प्रकरणी मेहकर पोलिसांनी संशयित चार आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे.

शहरातील माळीपेठ येथील आकाश राजू नन्नवरे या युवकाची जानेफळ रस्त्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणी आकाशचे वडील राजू नन्नवरे यांनी दिलेल्या फिर्यादीत गणेश किशोर थाबडे रा.माळीपेठ याने आकाश नन्नवरे यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचे म्हटले आहे. त्यावरून मेहकर पोलिसांनी गणेश थाबडे यांच्यासह दोन ते तीन जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. मेहकर शहरात युवकाच्या हत्येमुळे खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच, सिंदखेडराजाच्या उपविभागीय पोलिस अधिकारी कदम आणि मेहकरचे ठाणेदार राजेश शिंगटे यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.


कोल्ड माइंड मर्डर, धमकी देऊन केला निर्घृण खून!

  • मेहकर येथे २७ मेच्या रात्री २२ वर्षीय युवकांचा खून झाला ज्यात विशेष म्हणजे खून झालेल्या युवकच्या घरी जावून आरोपीने जीवे मारण्याची धमकी दिली होती. ज्याने हा नियोजीत कट रचल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे खून करण्याची पद्धत पण क्रूर असल्याचे दिसून येते. ज्याने मेहकर मध्ये गुन्हेगारी वाढल्याचे पहायला मिळत आहे. आकाश राजू ननवरे (वय २२) या युवकाचे व मेहकरमधील गणेश किशोर थाबडे याचे जुने वाद होते. या पूर्वी किशोरने आकाशच्या घरी जावून जिवाने मारून टाकीन, अशी धमकी दिली होती आणि ती धमकी त्याने प्रत्यक्षात उतरवली. अश्यातच २७ मेच्या रात्री ११ वाजता दरम्यान किशोर थाबडे व त्यांचे दोन ते तीन मित्रासह कोणत्या तरी कारणाने आरोपीतांनी जानेफळ रोडवरील सैलानी बाबाच्या छलाव्याजवळ धारदार शास्त्राने आकाशच्या डोक्यावर दगड टाकला. ज्यात तो गंभीर जखमी झालेला होता. तेव्हा त्याला अकोला रेफर केले असता तो मृत झाला अशी फिर्याद मृतक आकाशचे वडील राजू नामदेव ननवरे यांनी दिली. त्या प्रकरणी मेहकर पोलिसांनी ३०२,५०६,३४ नुसार गणेश किशोर थाबडे व त्याच्या दोन ते तीन साथीदाराविरुद्ध गुन्हा दाखल केला. यातील आरोपी व मृतक यांनी सोबत जेवण केल्याची माहिती मिळाली. तसेच त्या नंतर आरोपींनी मृतकाला हॉटेल मागे नेऊन त्या ठिकाणी डोके आपटून मारले. यात विशेष म्हणजे सोबत जेवण केल्यानंतर आरोपीनी थंड डोक्याने खून केला. या गुन्हेगारवर या पूर्वीसुद्धा अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सोबत राहणार्‍या मित्रानी मित्राचा खून का केला, कोणाच्या सांगण्यावरून केला, खुनाचे कारण काय, हे सर्व आरोपी अटक झाल्या नंतरच समोर येणार आहे. त्यासाठी मेहकर ठाणेदार राजेश शिंगटे यांनी आरोपीच्या मागावर तीन पथके पाठवलेली आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!