KARAJAT

आमदार प्रा. राम शिंदे यांची भाजपने केली प्रवक्तेपदी निवड

कर्जत (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा प्रदेश मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. यामध्ये पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा आमदार प्रा. राम शिंदे यांच्या खांद्यावर पक्षाने जबाबदारी सोपवली असून यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

जनतेत पक्षाची भूमिका मीडियाच्या माध्यमांतून जावी यासाठी महाराष्ट्र भाजपने प्रदेश मीडिया विभागाच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहिर केल्या आहेत. पत्रकार नवनाथ बन यांच्याकडे माध्यम प्रमुख पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तर केशव उपाध्ये ‘मुख्य प्रवक्ते’ व विश्वास पाठक आणि अजित चव्हाण हे ‘सह-मुख्यप्रवक्ते’ म्हणून नियुक्त केले आहेत. त्याचबरोबर ९ प्रवक्ते तसेच विषयानुरुप तज्ञ अशा ३१ पॅनेलिस्ट सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपने नियुक्त केलेले प्रवक्ते आणि पॅनेलिस्ट सदस्य खालील प्रमाणे आ.प्रा.राम शिंदे, आ.राम कदम, आ.अमित साटम, भालचंद्र शिरसाट, शिवराय कुलकर्नी, श्रीमती श्वेता शालिनी, गणेश खणकर, अ‍ॅड.राजीव पांडे, कु.प्रेरणा होनराव, पॅनेलिस्ट सदस्य म्हणून खालील व्यक्तीची निवड करण्यात आली आहे.
खा.डॉ. अनिल बोंडे (अमरावती), आ.निरंजन डावखरे (ठाणे), आ.प्रवीण प्रभाकर दटके (नागपूर), आ.सिध्दार्थ शिरोळे (पुणे), आ.श्वेता महाले (बुलढाणा), गणेश हाके (लातूर), अवधूत वाघ (मुंबई), राम कुलकर्णी (बीड), प्रवीण घुगे (संभाजीनगर), धर्मपाल मेश्राम (नागपूर), लक्ष्मण सावजी (नाशिक), मिलींद शरद कानडे (नागपूर), विनोद वाघ (वाशिम), मो.असिफ भामला (मुंबई), मकरंद नार्वेकर (मुंबई), प्रदीप पेशकार (नाशिक), श्रीमती दिपाली मोकाशी (मीरा भाईंदर), विनायक आंबेकर (पुणे), श्रीमती शिवानी दाणी (नागपूर), अ‍ॅड.आरती साठे (मुंबई), प्रो.आरती पुगांवकर (मुंबई), नितीन सुरेश दिनकर (अहमदनगर), श्रीमती प्रीती गांधी (मुंबई), श्रीमती राणी द्विवेदी-निघोट (मुंबई), श्रीमती श्वेता परुळकर (मुंबई), राम बुधवंत (संभाजीनगर), अली दारुवाला (पुणे), चंदन गोस्वामी (नागपूर), आशिष चंदारमा (अकोला), श्रीमती देवयानी खानखोजे (मुंबई), श्रीमती मृणाल पेंडसे (ठाणे).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!