CrimeMEHAKAR

गणपूर येथून अज्ञात चोरट्याकडून मोटरसायकलची चोरी

मेहकर (तालुका प्रतिनिधी) – घरासमोर लावलेली मोटरसायकल अज्ञात चोरट्यांनी पळवली. पंधरा दिवस उलटूनही पोलिसांना चोरट्यांचा शोध लागत नसल्याने मेहकर पोलिसांविषयी तीव्र संताप व्यक्त होत आहे.

गणपूर तालुका मेहकर येथील विनोद देविदास तुपकर यांनी मेहकर पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून गणपूर बस स्टैंड जवळ त्यांचे घर आहे. दिनांक २५ डिसेंबर २०२२ रोजी त्यांनी रात्री दहा वाजताच्या सुमारास घरासमोर मोटरसायकल लावून देऊन ते रात्रीला झोपून राहिले. सकाळी उठल्यानंतर पाहिले असता त्यांची हिरो कंपनीची स्प्लेंडर प्रो काळ्या रंगाची मोटरसायकल क्रमांक एमएच २८ एडी २९ ७१ ही दिसून आली नाही. त्यांनी आजूबाजूला शोध घेतला असता मिळून न आल्यामुळे अखेर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन फिर्याद नोंदवली आहे. अज्ञात मोटरसायकल चोरट्याविरुद्ध विनोद तुपकर यांच्या फिर्यादीवरून विविध कलमाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद तुपकर यांनी पोलिसांना त्यांनी सांगितलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याची विनंती केली आहे. परंतु गेले पंधरा दिवस झाले तरीसुद्धा पोलिसांनी कुठलीही हालचाल न करता सीसीटीव्ही फुटेजचीसुद्धा तपासणी केली नाही, अशी माहिती त्यांनी बोलताना आमच्याशी दिली आहे. त्यामुळे पोलिसांच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे केले आहे.


दरम्यान, देऊळगाव घुबे, चिखली येथूनही मोटारसायकली चोरीस गेल्या आहेत. त्यांचादेखील अद्याप तपास लागलेला नाही. याबाबत अंढेरा व चिखली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील घाटावरील तालुक्यांत मोटारसायकली चोरांची टोळी सक्रीय असल्याचा संशय निर्माण झाला असून, या टोळीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश येत नसल्याने तीव्र संताप निर्माण झालेला आहे.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!