Aalandi

तळेगाव दाभाडेतील सी.ए. आदित्य गाडे यांचा सत्कार

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : तळेगाव दाभाडे शहरातील आदित्य गाडे चार्टड अकाउंटंट ( सीए ) परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने भाजप तळेगाव दाभाडे शहराच्या वतीने माजी राज्यमंत्री बाळा भेगडे याच्या हस्ते सत्कार करीत परिसरातील नागरिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला. कालिका देवी कासार गणेश उत्सव मंडळ पुणे, आळंदी जनहित फाउंडेशन, स्वामी समर्थ परिवार, सचिन सोळंकर फ्रेन्ड सर्कल आदींचा समावेश होता.  यावेळी आदित्य गाडे म्हणाले, माझ्या आई-वडिल व परिवराने मला मोठे स्वप्न पहायला शिकवले तसेच ते पुर्ण करण्याचे सामर्थ्य दिले. आज त्यांच्या मुळेच हे यश मिळाल्याचे सांगितले.

याप्रसंगी शहराध्यक्ष रविंद्र माने, नगसेवक अमोल शेटे, नगरसेविका शोभा भेगडे, सरचिटणीस श्रीमती रजनी ठाकूर, प्रमोद देशक, उपाध्यक्ष सुधीर खांबेटे, संजय जाधव, कामगार मोर्चा अध्यक्ष अशोक दाभाडे, ओबीसी मोर्चा अध्यक्ष नितीन पोटे, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी उपाध्यक्ष सुधाकर देशमुख, सोशल मीडिया अध्यक्ष उपेंद्र खोल्लम, प्रज्ञा आघाडी अध्यक्ष पद्मनाभ पुराणिक, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी अध्यक्ष अनिल वेदपाठक, व्यापारी आघाडी अध्यक्ष निर्मलशेठ ओसवाल, उत्तर भारतीय आघाडी अध्यक्ष अंशू पाठक, व्यापारी आघाडी कार्याध्यक्ष सागरशेठ शर्मा, ओबीसी मोर्चा कार्याध्यक्ष सचिन जाधव, सरचिटणीस आशुतोष हेंद्रे, कामगार मोर्चा कार्याध्यक्ष स्वप्नील भेगडे, ज्येष्ठ कार्यकर्ता आघाडी सरचिटणीस दिलिप सुतार, सचिव श्रीकांत वालावलकर, शहर सचिव गणेश देवरे, कामगार मोर्चा सरचिटणीस आनंद पूर्णपात्रे, सदस्य राजेंद्र डांगे, कृष्णांत चौगले, ओबीसी मोर्चा उपाध्यक्ष विवेक गायकवाड, सांस्कृतिक आघाडी उपाध्यक्ष अमोल गोरे आणि गाडे कुटुंबिय उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!