BULDHANAMEHAKARVidharbha

‘सिंघम’ स्टाईलने आवळल्या आंतरराज्यीय एटीएम चोरट्यांच्या मुसक्या!

मेहकर (रवींद्र सुरूशे) – जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत वाढत्या चोर्‍यांवर अंकुश लावण्यासाठी पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथक तयार करून, पोलिसांच्या गोपनीय सूत्राकडून व सीसीटीव्हीच्या साह्याने जानेफळ पोलिसांनी अंतरराज्य एटीएम चोरांना ‘सिंघम’ स्टाईल पकडले. जानेफळ बसस्थानकावर सिंघम स्टाईलने पोलिसांनी तसेच ठाणेदार राहुल गोंदे यांनी एन्ट्री करून आंतरराज्य एटीएम चोराला पकडल्याने बघायचे डोळ्याचे पारणे फिटले. या कारवाईने मेहकरसह जिल्ह्यातील एटीएम चोरीच्या घटनांचा छडा लागण्याची आशा पल्लवीत झाली आहे.

जानेफळ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येत असलेल्या उटी येथील बाबूसिंग दासू राठोड यांनी दि. १ डिसेंबर २२ रोजी सेवानिवृत्तीचे पैसे जानेफळ एसबीआय एटीएममधून ५००० रुपये काढत असताना दोन अज्ञात व्यक्तीपैकी एका व्यक्तीने त्यांच्याशी संवाद सुरू केला तर दुसर्‍याने शिताफिने एटीएम कार्ड काढून बनावट एटीएम कार्ड त्यांच्या हाती दिले, व ग्रे कलरच्या स्विफ्ट डिझायरने फरार झाल्यानंतर बँक कोड सी ००१ वरून चार वेळेस २१ हजार रुपये फिर्यादीच्या खात्यातून काढून फिर्यादीला फसविल्याप्रकरणी जानेफळ पोलीस स्टेशनला कैफीयत दिली असता भादंवि ४१९, ४२०,३४ अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले होते. हा गुन्हा उघड करण्याच्या दृष्टीने सारंग आव्हाड पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार राहुल गोंधे यांनी शोधकामी पथक तयार केले. सी.सी.टीव्ही च्या फुटेज वरून गुन्हयातील गाडी जानेफळ बस स्थानकावर असल्याचे गोपनीय सूत्राकडून समजताच पोलिसांनी सापळा रचून पकडण्याचा प्रयत्न करत असताना सदर गाडीमधील चोरट्यांनी वेगाने अमडापूरमार्गे धाव घेतली. तेव्हा सिंघम चित्रपटातील दृश्याप्रमाणे जाधव पो.कॉ. यांच्या टू व्हीलरवरून गाडीचा पाठलाग करून गाडी अडविली असता चोरट्यांना सिंघम स्टाईलने जेरबंद केले.

पोलिसांच्या चौकशीदरम्यान आरोपींनी बिरबल कुमार प्रदीप कुमार राम २१वर्ष रा. परमाणपुर ता.दावत जि.रोहतास राज्य बिहार व सुनील उर्फ लेफ्टी सखाराम जाधव वय २६ वर्ष रा. उल्हासनगर मारळगाव ता.जि.कल्याण सांगून त्यांच्याकडून ग्रे रंगाची स्विफ्ट गाडी क्र. एमएच ०५ एबी ५०६३ ही गाडी, २ मोबाइल गुन्हयातील रोख रक्कम, २ डुप्लीकेट एटीएम कार्ड असे जप्त करण्यात आले आहे. पोलिसांनी पोलिसांचा खाक्या दाखवतास मेहकर तालुक्यासह बुलढाणा जिल्ह्यातील एटीएम चोरीच्या घटना उघडकीस होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर गुन्ह्याचा तपास जानेफळ पोलीस करीत आहेत.
—————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!