Head linesPachhim MaharashtraSOLAPUR

श्रमिकांच्या हक्काच्या घरकुलासाठी निधी कमी पडू देणार नाही!

सोलापूर (जिल्हा प्रतिनिधी) – दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथे रेनगर फेडरेशनच्या माध्यमातून साकारत असलेला ३० हजार घरांचा प्रकल्प हा भांडवलदारांचा नसून, श्रमिक-कष्टकर्‍यांचा आहे. तेव्हा श्रमिकांना हक्काचा निवारा देणार्‍या या प्रकल्पपूर्तीसाठी आपले सर्वतोपरी सहकार्य राहील, अशी ग्वाही पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी दिली.

पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी रेनगरला भेट देऊन या प्रकल्पाबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी त्यांच्यासमोर या प्रकल्पाचे सादरीकरणही करण्यात आले. याप्रसंगी या प्रकल्पाचे मुख्य प्रवर्तक तथा माजी आमदार नरसय्या आडम, माजी नगरसेविका कामिनी आडम, माकपचे जिल्हा सचिव एम.एच. शेख. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आमदार सुभाष देशमुख, आमदार राजेंद राऊत, म्हाडाचे सीईओ नितीन माने, जि.प.च्या सीईओ मनीषा आव्हाळे, एमजेपीचे अधिकारी उमाकांत माशाळे, बांधकाम खात्याचे अधिकारी महाजन, वीज वितरण कंपनीचे अधिकारी सांगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

प्रारंभी प्रकल्पाबाबत बोलताना नरसय्या आडम म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत साकारत असलेल्या रे नगर गृह प्रकल्पाकडे खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष लक्ष आहे. या प्रकल्पासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी सर्वतोपरी सहकार्य केले असून आता देखील संपूर्ण सहकार्याची त्यांची भूमिका आहे. हा प्रकल्प ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण करण्याचे शासनाचे निर्देश आहेत. या प्रकल्पासाठी पाणी, रस्ते, वीज या मूलभूत सुविधांसाठी ३०० कोटी मंजूर आहेत. या कामांच्या शुभारंभासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावे यासाठी आमचा जोरदार पाठपुरावा आहे, पण आचारसंहिता आदी कारणांमुळे ते येऊ शकले नाही. या पाशर््वभूमीवर फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कार्यक्रमासाठी यावेत, यादृष्टीने पालकमंत्र्यांनी प्रयत्न करावेत.

आडम यांच्या मागण्यांबाबत बोलताना पालकमंत्री म्हणाले की, हा प्रकल्प श्रमिकांचा असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून संपूर्ण शुल्कमाफी मिळावी यासाठी शासनदरबारी प्रयत्न करेन. या नगराला नगरपालिकेचा दर्जा मिळवून देण्यासाठी आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी प्रयत्न करावेत. या प्रकल्पासाठी माझ्या अखत्यारितील असलेल्या विषयांबाबत मी शंभर टक्के सकारात्मक निर्णय घेणार आणि अखत्यारितील नसलेल्या विषयांबाबत मी संबंधितांना शिफारस करणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!