Aalandi

आळंदीत स्वामी विवेकानंद आणि राजमाता जिजाऊ जयंती साजरी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील श्री भैरवनाथ शिक्षण संस्था संचलित, श्री पद्मावती माता प्राथमिक व माध्यमिक विद्यालय या प्रशालेत राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व युगपुरुष स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती नीलिमा, कार्यक्रमाचे अध्यक्षा सुवर्णा साळुंखे, प्रमुख पाहुण्या शिला भोसले यांच्या हस्ते राजमाता जिजाऊं आणि युगपुरुष स्वामी विवेकानंद यांचे प्रतिमेचे पूजन , पुष्पहार अर्पण करीत करण्यात आले. यावेळी शाळेतील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी स्वामी विवेकानंद व माता जिजाऊंची वेशभूषा परिधान केली होती. विद्यार्थ्यांची मनोगते, गीतगायन झाले. कार्यक्रमाचे नियोजन विलास गायकवाड यांनी केले. जिजाऊ वंदना मोहन शिल्पे यांनी केले. आभार श्रीमती सुनीता कशाळे यांनी मानले. बोर्ड रायटिंग अनुपमा पिसाळ, सुलोचना जावळे, सुवर्णा मोकळ यांचे सह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

आळंदी भाजी मंडईत जयंती साजरी

महाराष्ट्र राज्य कामगार सुरक्षा दल सलग्न पथारी सुरक्षा दल आळंदी शहर व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सामाजिक व बहुउद्देशीय ट्रस्ट,महाराष्ट्र राज्य. यांच्या वतीने भाजी मंडई आळंदी या ठिकाणी राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त प्रतिमा पूजन व पुष्पहार अर्पण करण्यात आले . आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ.उर्मिला शिंदे, पथारी सुरक्षा दलाचे पुणे जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष संतोष सोनवणे यांच्या हस्ते करण्यात आले. डॉ. उर्मिला शिंदे यांनी कार्यक्रमास प्रबोधन केले. आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या कविता भालचिंम उपस्थित होते. यावेळी अधीक्षक डॉ. उर्मिला शिंदे, कविता भालचिंम यांचा पथारी सुरक्षा दलाच्या भाजी मंडई शाखा महिला आघाडीच्या वतीने शॉल, श्रीफळ, गुलाब देऊन सन्मान करण्यात आला. संयोजन पथारी सुरक्षा दल आळंदी शहराध्यक्ष गणेश काळे, भानुदास मदने, गोरक्षनाथ खांडे, गणेश मुंजाळ,निलेश ढोकणे,गजानन मिटकरी, बाळासाहेब जाधव, इम्तियाज शेख,गळे काटू, रायबोले महाराज, नवनाथ बोडरे, काकडे महाराज, संतोष थोरवे, कल्याणीताई बहुले, राणीताई सानप, काळे मावशी, रंजना गायकवाड, चमा गायकवाड, साळुंके ताई, दीक्षाताई गायकवाड, मुंडे ताई, सुलोचना ढोकणे आदी शिवप्रेमी व माँसाहेब जिजाऊ भक्त उपस्थित होते.

ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल मध्ये जन्मोत्सव साजरा

मुक्तादेवी शिक्षण प्रसारक मंडळ व पद्मावती देवी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित ग्यान ज्योत इंग्लिश स्कूल मध्ये राजमाता जिजाऊ जन्मोत्सव आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. विद्यार्थीनी राजमाता जिजाउंच्या वेशभूषेत अतिशय सुंदर दिसत होत्या. विद्यार्थ्यांनी विविध प्रकारच्या वेशभूषा केल्या होत्या. विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांचा जीवनपट सांगून त्यांच्या कार्याची माहिती सांगितली. याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र घुंडरे, संचालिका कीर्ती घुंडरे, मुख्याध्यापक, सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन ऋतुजा भारंबे व अक्षरा आघाव यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!