Aalandi

गायत्री विद्यालयातील विद्यार्थ्यांची स्पर्धेत यशस्वी कामगिरी

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : पिंपरी चिंचवड महानगरपालिका व पुणे जिल्हा क्रीडा परिषद पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय तायक्वोंदो, वुशो आदी शालेय क्रीडा स्पर्धा पै. मारोतराव लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र भोसरी येथे तसेच विभागीय नेमबाजी स्पर्धा अहमदनगर येथे उत्साहात झाल्या. या स्पर्धांत चऱ्होली बुद्रुक येथील गायत्री विद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत यशस्वी कामगिरी करीत प्रशालेचे नावलौकिकात भर घातली.

या स्पर्धांमध्ये स्वामी विवेकानंद शिक्षण प्रसारक मंडळ संचलित गायत्री इंटरनॅशनल स्कूल चऱ्होली बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी आपल्यातील कलागुणांचे उत्कृष्ट प्रदर्शन करीत यश संपादन केले. संस्थाध्यक्ष विनायक भोंगाळे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले. १४ वर्ष वयोगटातील पराग पाटील याने रौप्य पदक, तर १७ वर्षीय गटामध्ये ज्ञानेश पठारे व श्रेयश पठारे यांनी अनुक्रमे रौप्य पदकावर आपले नाव कोरले. वुशू स्पर्धेमध्ये आनंद गवई याने सुवर्णपदक तर वरद गवळी याने रौप्य पदक पटकावले.

अहमदनगर येथे पार पडलेल्या शालेय विभागीय नेमबाजी स्पर्धेत गायत्री महाविद्यालयातील विद्यार्थी ओम पोखरकर याने १९ वर्षे वयोगटात जिल्हा स्तरावर उत्कृष्ट खेळी करत सुवर्णवेध घेतला. तर विभागीय स्तरावर रौप्य पदक मिळवत पुढील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान निश्चित केले. याप्रसंगी संस्थेच्या संचालिका कविता कडू पाटील, विश्वस्त सरिता विखे पाटील यांनी सर्व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले. शाळा व महाविद्यालयाच्या प्राचार्या तसेच क्रीडा शिक्षक प्रफुल्ल शिंदे यांनी सर्व खेळाडूंना मार्गदर्शन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!