Aalandi

किल्ले वाफगावात महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : किल्ले वाफगाव मध्ये येत्या ६ जानेवारी ला महाराजा यशवंतराव होळकर राज्याभिषेक दिन विविध सेवाभावी संस्था यांचे वतीने भव्य प्रमाणात साजरा होणार आहे. यासाठी राज्याभिषेक दिन सोहळा नियोजन पूर्व आढावा बैठक प्रमुख मार्गदर्शक श्रीमंत भूषणसिंह राजे होळकर यांचे उपस्थितीत पार पडली.

या बैठकीचे आयोजन यशवंत संघर्ष सेना महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विष्णू कुर्हाडे, उपाध्यक्ष भागवत काटकर यांनी केले होते. या प्रसंगी बाळासाहेब सानप, गंगाधर नाना काळकुटे, किशोर काळदाते, मनोज मराठे, सोमनाथ काशीद, संजय वाजे, राजेश दिवटे, पंढरीनाथ ढाले, अविनाश दादा सकुंडे, अरविंद वलेकर, मनोज पिंगळे, बाळासाहेब खांडेकर, गणेश गरुड, वैजिनाथ ठवरे, लक्ष्मण शिंदे, भागवत आवटे, शिरीष कारेकर, आबा खताळ, शिवाजी जाधव, वेंकट नाईक, प्रकाश बनकर, योगिता काटकर, ज्योती कुऱ्हाडे, कांचगुडे महाराज, कावळे महाराज, शिवाजी धुळगंड, बाळासाहेब कवळासे, सिद्धेश्वर सलगर, एकनाथ म्हस्के, नामदेव म्हात्रे, मल्हारी कानडे, विजय खेमनर, बाळासाहेब वायकुळे आदीसह राज्यातून आलेले समाज बांधव, कार्यकर्ते उपस्थित होते.

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ६ जानेवारी २०२३ रोजी महाराजा यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेक दिनाचे आयोजन पूर्व नियोजनास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनी सविस्तर चर्चा करून उत्साहात राज्याभिषेख दिन साजरा कारण्याचे ठरविले. पुणे जिल्ह्यातील सर्व समाज बांधवांनी आणि इतिहास प्रेमीं यांनी किल्ले वाफगाव एक पर्यटन स्थळ विकसित करून तेथील नागरिकांना रोजगार निर्माण होईल. अनेक तरुणांना रोजगाराची संधी निर्माण होईल. किल्ले वाफगावं येथे मर्दानी खेळाचे प्रात्याक्षिके, पारंपरिक कपडे हे आपल्या संस्कृतीचे दर्शन घडवते. आपल्या देशी खेळाचे जतन करावे, मैदानी खेळ मुलांना शिकवले पाहिजे यासाठी आवाहन करण्यात आले. आपला इतिहास ही गोष्ट म्हणून न पाहता त्याकडे डोळस पणाने बघून इतिहास घडवणारे महापुरुष तयार होतील. तरुण पिढी निर्माण करण्यात साठी महापुरुषांचे विचार अंगीकरणे गरजेचे आहे. महापुरुष हे सर्व समाजाचे असतात त्यांना जातीत बांधून ठेऊ नये असे यावेळी आवाहन करण्यात आले. येत्या ६ जानेवारीला सर्व समाजातील लोकांनी वाफगाव येथील किल्ल्यावर राजा चक्रवर्ती यशवंतराव होळकर यांच्या राज्याभिषेख करण्यास उपस्थित रहावे असे आवाहन यशवंत संघर्ष सेनेचे राज्य अध्यक्ष विष्णू कुऱ्हाडे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी महाराष्ट्रातून विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!