ChikhaliVidharbha

शेतकर्‍यांची हेळसांड थांबवा; वंचित शेतकर्‍यांची प्रधानमंत्री सन्मान योजनेची रक्कम अदा करा!

चिखली (विशेष प्रतिनिधी) – तालुक्यातील शेतकर्‍यांना यापूर्वी सुरळीतपणे प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेचे दोन हजार रुपये नियमित मिळायचे. परंतु, शेतकर्‍यांनी ई-केवायसी केली तेव्हापासून अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित असल्याने त्या शेतकर्‍यांना न्याय देण्यात यावा, व शेतकर्‍यांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विनायक सरनाईक यांनी शेतकर्‍यांसह तहसीलदार व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

शासनाने सन २०१८ मध्ये शेतकर्‍यांच्या सन्मानासाठी प्रधानमंत्री शेतकरी सन्मान (पी.एम.किसान) योजना सुरु केली आहे. तेव्हापासून शेतक-यांच्या खात्यावर नियमित दोन हजार रुपये हप्ता जमा होत होता. मात्र जेव्हापासून ई-केवायसी केली तेव्हापासून तालूक्यातील अनेक शेतकरी या योजनेचा दोन हजार रुपये हप्ता मिळणेपासून वंचित झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील असंख्य शेतकर्‍यांची लाखो रुपयांची रक्कम रखडून पडली आहे. यापूर्वी त्रुटी दुरुस्तीसाठी शेतकर्‍यांना तहसील विभागाकडून न्याय मिळाल्याने योजनेपासून वंििचत असलेले शेतकरी रखडलेली रक्कम मिळावी, यासाठी तहसील विभागात गेल्यास त्यांना मात्र आता कृषी विभागात जाण्याचा सल्ला दिला जात आहे. शेतकरी कृषी विभागात गेल्यास ही योजना महसूल विभागाअंतर्गत येत असून, त्याबाबतचे पासवर्ड आयडी तहसीलकडेच असल्याचे सांगितले जात असल्याने शेतकरी तहसील व कृषी विभागाचे उंबरठे झिजवत आहेत. परंतु नुसतेच हेलपाटे मारावे लागत असल्याने शेतकर्‍यांची हेळसांड होत आहे.

शेतकरी सन्मान योजनेसाठी सातबारा महत्वाचा असल्याने या बाबतची कार्यवाही महसूल प्रशासन करत असल्याने सदरील जबाबदारी महसूल विभागाची असल्याचे म्हणत, चिखली तालुक्यातील शेतकर्‍यांची रखडून पडलेला दोन हजार रुपये हप्ता रक्कम खात्यावर जमा करण्यात यावी, योजनेपासून वंचित असलेल्या शेतकर्‍्यांचा योजनेत समावेश करण्यात यावा, शेतकर्‍यांची होत असलेली हेळसांड थांबवण्यात यावी, अशी मागणी तहसीलदार व तालूका कृषी अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करीत पत्राव्दारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विनायक सरनाईक यांनी शेतकर्‍यांसह केली आहे. शेतकर्‍यांची हेळसांड होणार नाही. याबाबतच्या सूचना सबंधित कर्मचारी यांना देणार असल्याचे अश्वासन तहसीलदार यांनी दिले. मागण्यांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. यावेळी अरुण पन्हाळकर, प्रल्हाद देव्हडे, रामकृष्ण चव्हाण, ज्ञानेश्वर भिसे, डिगांबर नेमाने, विशाल चिंचोले, मनोहर कळसकर, मधुकर नेमाने, लक्ष्मण जाधव, विष्णू इंगळे, परमेश्वर शिर्वेâ, गोपाल चव्हाण, ज्ञानेश्वर आंभोरे, विश्वनाथ घाडगे, भागवत पन्हाळकर, परमेश्वर रक्ताडे, संदीप जायगुडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.
———————

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!