बुलढाणा (जिल्हा प्रतिनिधी) – खामगांव येथील जनसेवेत सदैव अग्रेसर असणारे एकनिष्ठा फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सुरज यादव यांनी आतापर्यंत हजारों गरीब, गरजू व दिव्यांग रुग्णाला आर्थिक मदत व रक्तदाते, औषधी वेळोवेळी एकनिष्ठा जनसेवा फाऊंडेशनच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्याने पोहोचविली, या जनसेवेची दखल घेत रुग्ण हक्क संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष अॅडवोकेट निलेश करमुडी व प्रदेश अध्यक्ष हनमंत गोत्राळ यांनी त्यांची रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या बुलढाणा जिल्हा संघटकपदी नियुक्ती केली आहे. या नियुक्तीनंतर आपल्यावर विश्वास ठेवून आपण ही जबाबदारी दिली, मी आणि माझे मित्रबंधु रुग्णसेवेसाठी सदैव तत्पर राहणार, अशी ग्वाही सुरज यादव यांनी दिली. यादव यांचे या नियुक्तीबद्दल सर्वस्तरातून अभिनंदन होत असून, ब्रेकिंग महाराष्ट्रचे मुख्य संपादक पुरुषोत्तम सांगळे, सहसंपादक एकनाथ माळेकर यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
————-
Leave a Reply