Aalandi

महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर यांना पुरस्कार प्रदान

आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : श्री वैष्णव किंकर विष्णुदास दरेकर गुरुजी व परिवार यांचे वतीने स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज पुरस्कार महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर यांना वारकरी शिक्षण संस्थेचे जेष्ठ अध्यापक माजी अध्यक्ष मारुती महाराज कुरेकर यांचे हस्ते हरिनाम गजरात प्रदान करण्यात आला. या निमित्त आयोजित महाअन्नदान उपक्रमात सुमारे सात हजारांवर भाविकांनी मांडे भोजनाचा लाभ घेतला.

वै. प. पू. विठ्ठल महाराज चौधरी यांचे बारावे पुण्यस्मरण सोहळा श्रीक्षेत्र आळंदी येथील फ्रुटवाले धर्मशाळेत भव्य प्रमाणात वारकरी सांप्रदायाच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, प्रवचन आदी कार्यक्रमांनी हरिनाम गजरात त्रिदिनी सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त सकाळ संध्याकाळ अशी दोन कीर्तन सेवा उल्हास महाराज सूर्यवंशी व डॉ. नारायण महाराज जाधव यांचे झाले. पुण्यतिथी दिनी रामभाऊ महाराज राऊत व पूज्य परमेश्वर महाराज जायभाये यांचे अनुक्रमे सकाळी व संध्याकाळी कीर्तन झाले. या शिवाय पूज्य रामभाऊ महाराज राऊत यांची प्रवचने उत्साहात झाली. या तीन दिवशीय अखंड हरिनाम सप्ताहात परमपूज्य शांतिब्रह्म मारुती महाराज कुरेकर यांचे काल्याचे किर्तन झाले. सोहळ्यात श्री वारकरी विठ्ठल सेवा संस्था पूज्य रामभाऊ महाराज राऊत महाराज , पिंपरी चिंचवड मधील उद्योगपती सुनील चौधरी यांच्या तर्फे अन्नदान सेवा रुजू झाली. काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी खानदेश अर्थात जळगाव परिसरातून गोविंद महाराज चौधरी यांच्या नेतृत्वात मांडे भोजनाचा कार्यक्रम उत्साहात झाला.

सुमारे हजारो भाविकांना ( सात हजार) अन्नदान महाप्रसाद वाटप करण्यात आला. सप्तहाचे काळात रोज भोजन महाप्रसादास तीन हजारावर भाविक भक्त उपस्थित राहत होते. वारकरी संप्रदायातील शांतिब्रह्म मारुती महाराज कुरेकर, रामभाऊ महाराज राऊत, माणिक महाराज शास्त्री, पूज्य उल्हास महाराज, ज्ञानेश्वर माऊली कदम, भास्कर महाराज, पद्माकर महाराज पाटोळे,आत्माराम महाराज शास्त्री, आबासाहेब महाराज गोडसे, परमेश्वर महाराज जायभाये, गोविंद महाराज चौधरी, माऊली कुऱ्हाडे , माजी अध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी. डी. भोसले पाटील ,नवनाथ काशीद, त्र्यंबक महाराज कोळकर, संजय महाराज कावळे, भागवत महाराज साळुंखे, विलास घुंडरे पाटील, माजी उपनगराध्यक्ष मुरलीधर पाटील, श्री राम मंदिराचे विश्वस्त संजय आवेकर, सुनील भदे, रघुवीर ओक, हुंभे महाराज, शिवाजी महाराज वाघ, तुकाराम महाराज मुळीक, संतोष महाराज मोहिते, गजानन महाराज पवार, आसाराम महाराज बढे, विष्णु महाराज मिर्धे, वारकरी संप्रदायाचे सर्व आजी-माजी विद्यार्थी, गुरुबंधू आणि आळंदी व पंचक्रोशीतील भाविक उपस्थित होते. यावेळी श्रवणासह महा प्रसादाचा लाभ भाविकांनी घेतला. समारोपात श्री वैष्णव किंकर विष्णुदास दरेकर गुरुजी व परिवार यांचे वतीने देण्यात येणार स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज यांच्या नावाचा पुरस्कार यावर्षी महामंडलेश्वर रामकृष्णदास महाराज लहवितकर यांना प. पू. मारुती महाराज कुरेकर यांचे हस्ते प्रदान करण्यात आला.

पुरस्काराचे स्वरूप- गौरव पत्र, सन्मानचिन्ह ,पूर्ण पोशाख, फेटा उपरणे आणि रोख १५ हजार, १११ अशी रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी हरिभक्त परायण मंडळी खूप मोठ्या संख्येमध्ये उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉक्टर योगेश्वरी भट यांच्या द्वारा चांगदेव पासष्टी या ६५ ओव्यांवरील ग्रंथाचे प्रकाशन ह. भ.प बाजीराव महाराज चंदिले, गोविंद महाराज चौधरी, नरहरी महाराज चौधरी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. पूज्य विठ्ठल महाराज चौधरी यांचे बारावे पुण्यस्मरण म्हणजे तपपूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन वारकरी शिक्षण संस्थेच्या आजी-माजी विद्यार्थी वर्गाने व गुरुजनांनी मोठ्या प्रमाणात केले. फ्रुटवाले धर्मशाळेतील रसिकलाल शेठ धारीवाल संकुलामध्ये संपन्न होत असताना कोद्रे मंडप साऊंड सिस्टिमचे संचालक कमलेश कोद्रे यांनी विशेष सहकार्य केले. राज्यातील विविध जिल्यातून भाविक या सोहळ्यास आले होते. अकोल्यातून वासुदेव महाराज महल्ले, रायगड मधून धनाजी महाराज पाटील, पुंडलिक महाराज पाटील ,ठाण्यामधून अजय पाटील उपस्थित होते. त्रिदिनी अखंड हरिनाम सप्ताहात हरिपाठ, कीर्तन-प्रवचन, अन्नदान उत्साहात झाले. सोहळ्यात पखवाज मृदुंगाचार्य एकनाथ महाराज कोष्टी यांचेसह हजारोंच्या संख्येने उपस्थित राहिलेले विद्यार्थी, गुरुबंधू यांनी टाळ घेऊन साथ केली. आळंदी पंचक्रोशीत या सोहळ्याचे कौतुक झाले. अन्नदान उपक्रमात हरिभक्त परायण सुखदेवाप्पा पाटील यांनी भाविकांची आस्थेने चौकशी करीत सेवा रुजू केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!