आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : जागतिक दिंव्याग दिनानिमित्त खेड पंचायत समिती खेड, समावेशित शिक्षण विभागाच्या वतीने दिंव्याग विद्यार्थ्याचे कला गुणांना वाव देण्यासाठी आयोजित स्पर्धांत दिव्यांग मुलांनी स्पर्धात सहभागी होत स्पर्धाना विशेष यश संपादन करीत उत्साहात क्रीडा स्पर्धां पार पडल्या. दिव्यांग मुलांचे क्रीडा नैपुण्य वाढीसाठी या खेड तालुका स्तरीय विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन खेड पं. स. शिक्षण विस्तार अधिकारी बेबी दरेकर, खेड तालुका प्राथ.शिक्षक संघाचे अध्यक्ष तान्हाजी म्हाळुंगकर यांच्या हस्ते झाले.
स्पर्धेत खेड तालुक्यातील जि.प.शाळातील सर्व दिव्यांग विद्यार्थांनी सहभाग घेतला. या मध्ये बादलीत चेंडू फेकणे, स्टाथरमार्कल, चमचा लिंबू, धावणे, चित्रकला, संगीत खुर्ची आदी स्पर्धाचा समावेश होता. या स्पर्धा खेड पंचायत समितीचे अंतर्गत शिक्षण विभागातील विविध विषय तज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडल्या. स्पर्धेत जि. प. प्राथमिक शाळा दिघे डुंबरे वस्ती या शाळेतील ओंकार डुंबरे यांने विविध स्पर्धामध्ये बक्षिसे मिळवली. यात स्टाथरमार्कल – प्रथम क्रमांक, चमचा लिंबू-द्वितीय क्रमांक, धावणे – तृतीय क्रमांक पारितोषिके मिळवीत शाळेचे नावलौकिक वाढविले. मार्गदर्शक शिक्षिका शैला जांभळकर यांचे खेड पं. स. चे गटशिक्षणाधिकारी जीवन कोकणे, डायटचे वरिष्ठ अधिव्याख्याता साहेब वाटेकर, विस्तार अधिकारी बेबी दरेकर, सर्व विषय तज्ज्ञ टिम, केंद्र प्रमुख दादा कुसाळकर, केंद्र प्रमुख संतोष मांजरे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष संतोष होरे, उपाध्यक्ष राहुल डुंबरे यांचेसह समिती सदस्य यांनी विजेते स्पर्धक ओंकार डुंबरे, मार्गदर्शक शिक्षक यांचे अभिनंदन केले.