आळंदी (अर्जुन मेदनकर) : पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांदादा पाटील यांनी महापुरुषांच्या कार्याबद्दल अवमानकारक वक्तव्य करून जनतेच्या भावना दुखावल्याने राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांदादा पाटील यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड. विष्णू तापकीर यांनी केली आहे.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी क्रांतीज्योती महात्मा फुले, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या तत्कालीन शाळा सुरु करण्याच्या कामकाजाचा दाखला देत त्यांचे कार्याविषयी अवमानकारक वक्तव्य करून महाराष्ट्रातील जनतेच्या भावना दुखावल्या व अवमान केल्याबद्दल पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अॅड.विष्णू तापकीर यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचेकडे मेलद्वारे राजीनाम्याची मागणी केली आहे. भाजपचे नेते मंडळी नेहमी संत, राष्ट्रपुरुष तसेच महापुरुषांचा सतत अवमानकारक वक्तव्य करून जनतेच्या भावना दुखावतात. याविषयी केंद्रीय भाजपचे वरिष्ठ नेते संबंधित यांना पाठीशी घालत असून, त्यांचेवर कोणतीही कारवाई करीत नाही. हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. या मागचे गौड बंगाल काय आहे असा सवाल अॅड. तापकीर यांनी केला आहे.