चिखली (विशेष प्रतिनिधी) – चिखली तालुक्यातील भरोसा व रामनगर गट ग्रामपंचायती अंतर्गत येणार्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेला आयएसओ मानांकन मिळाले आहे. या शाळेच्या उत्कर्षाबद्दल सर्वस्तरातून शाळेचे तसेच शालेय व्यवस्थापन समिती, शिक्षक, गावकरी मंडळी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
भरोसावाडी (रामनगर) एक छोटसे गाव. भरोसा या गट ग्रामपंचायतीअंतर्गत दोन ग्रामपंचायत सदस्य असणारे, पण गावातील लोकांचा शाळेबाबतचा आदर, आस्था खूप मोठी. शाळेतील चांगल्या गुणवत्तेबाबत केंद्रप्रमुख यांनी शालेय व्यवस्थापन समितीला सांगून शाळा आयएसओबाबत माहिती दिली. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ यांनी याला लगेच सकारात्मक प्रतिसाद दिला. समितीच्या अध्यक्षा सौ.सुनिता नवनाथ बहुले तथा उपाध्यक्ष, सदस्य यांनी आर्थिक बाबतीचे नियोजन केले. गावातील नोकरदार मंडळींचा ग्रुप तयार करून शाळेविषयीची संकल्पना सांगितली आणि अनेक मान्यवरांनी आर्थिक मदत, वस्तू स्वरूपात, श्रमदानातून मदत केली.
यात तुळशीदास बाहुले साहेब अडिच हजार, भगवान नारायण होळकर साहेब पाच हजार, रामदास सुरेश कदम साहेब पाच हजार एक रुपये, प्रकाश रामदास होळकर साहेब पाच हजार एक, कैलास दत्तात्रय भगत साहेब ११ हजार, विशाल भगवान आनपट साहेब दीड हजार, भगवान कदम साहेब तीन हजार, रमेश भागवत साहेब एक हजार, मुरलीधर साहेब भगत १० हजार, अंकुशराव भगत साहेब २१ हजार, सतीश भगत साहेब अडिच हजार, विठ्ठल कदम साहेब एक हजार, केशव होळकर साहेब पाच हजार, अच्युतराव विश्वनाथ भगत साहेब ७ हजार ७७७, शिवाजी रामभाऊ लेंडे सर साऊंड सिस्टम, अंकुशराव एकनाथ भगत साहेब १२ हजार, अरुण रामभाऊ लेंडे सर यांनी शाळेला डायस भेट म्हणून दिलेली आहे. वरील सर्व मान्यवरांचे शाळेचे मुख्याध्यापक गाडेकर सर व शिक्षक वृंद यांनी आभार मानले आहेत.