आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या दिवाळीसाठीचे आनंद शिधा लाभार्थी रेशनिंग धारकांना खेड महसूल पुरवठा विभागा तर्फे संबंधित लाभार्थ्याना रेशनिंग दुकानदारांचे माध्यमातून परिश्रम पूर्वक देण्यात आल्याने आळंदी पंचक्रोशीत लाभार्थ्याची दिवाळी गोड झाली. यामुळे हजारो लाभार्थ्याना समाधान व्यक्त करीत राज्य शासनाच्या आनंदाचा शिधा या उपक्रमाचे स्वागत केले.
आळंदीतील शिधा वाटप केंद्र रेशनिंग दुकानदार दयानंद तोडकर, अनिल कुऱ्हाडे, अमित उगले, मंगलाताई वेळकर यांचे माध्यमातून आळंदी पंचक्रोशीतील हजारो लाभार्थ्याना दिवाळी पूर्वी शिधा वाटप शासनाचे निर्देश नुसार करण्यात आला. यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार,विविध संघटनांसह पक्ष संघटनेचे पदाधिकारी यांना वाटप प्रसंगी निमंत्रित कारुंषिद्ध वाटप करण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष बबनराव कुऱ्हाडे, माजी नगरसेवक डी.डी.भोसले पाटील, शहराध्यक्ष किरण येळवंडे, शेतकरी बचाव आंदोलनाचे उपाध्यक्ष बाळासाहेब पेटकर, स्वामी सुभाष महाराज, आळंदी जनहित फाउंडेशनचे कार्याध्यक्ष अर्जुन मेदनकर, गोविंद ठाकूर पाटील, विलास कुऱ्हाडे आदींचे उपस्थितीत लाभार्थ्याना शिधा वाटप करण्यात आले.
यावर्षी प्रथमच राज्य शासनाने एवढ्या मोठ्या प्रमाणात आनंदाचा शिधा उपक्रम प्रयेकी एक किलो राव,मेधा,साखर आणि पामतेल असा शिधा दिवाळी पूर्वी आळंदी पंचक्रोशीत वितरण केले. यामुळे यावर्षीची राज्य सरकार बदलल्याने पहिल्यादाच असा उपक्रम राबवित सर्व सामान्य जनतेला तसेच लाभार्थ्याना वाढती,महागाई,बेरोजगारी आणि पावसाने नुकसान झाल्याने दिवाळीत दिलासादायक निर्णय घेऊन शिधा उपलब्द्ध करून दिल्याने हजारो कुटुंबीयांची दिवाळी गोड झाली. यामुळे लाभार्थ्याना शासनाच्या निर्णयाचे तसेच उपक्रमाचे स्वागत करीत समाधान व्यक्त केले. सर्व सामान्य शेतमजूर, कामगार, कष्टकरी यांना शिंदे-फडणवीस सरकारच्या शेशनिंग लाभार्थ्याना रेशनवर आनंदाचा शिधा मिळाल्याने दिवाळी गोड होण्यास मदत झाली. गोरगरीब लाभार्थ्याना आनंदाचा शिधा वेळेत आणि विना अडथळा मिळावा यासाठी थेट ऑफलाईन देण्याचे सूचना देखील अडचणी आल्याने तात्काळ देण्यात आल्या. यामुळे तांत्रिक अडचणी तुन शिधा वाटपातील अडचण दूर झाली. यासाठी शिधा वाटपास येथील दुकानदार दयानंद तोडकर, अनिल कुऱ्हाडे, अमित उगले, मंगलाताई वेळकर यांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून आळंदी पंचक्रोशीतील लाभार्थ्याना आनंदाचा शिधा वाटप करण्यास विशेष परिश्रम घेतले. कमी वेळेत जास्तीत जास्त लाभार्थ्याना यामुळे शिधा वाटप करता आले. यातून समाधान मुळ्याचे त्यांनी सांगितले. राज्य शासनाने अवघ्या शंभर रुपयांत प्रत्येकी एक किलो साखर, रवा, चना डाळ, पामतेल उपलब्द्ध करून दिले. रेशन धारकांना आनंदाचा शिधा देत दिवाळी गोड करण्यास दिलासा दिला. रेशन दुकानातून सदर कीटचे वाटप होण्यासाठी आळंदीत जनजागृती देखील करण्यात आली. सोशल मीडियाचे माध्यमातून रेशनिंग वाटप दुकानदारांनी लाभार्थी यांना माहिती दिली.