– गाड्यांअभावी अनेक प्रवासी तासंतास बसस्थानकावर उभे
मेहकर (तालुका प्रतिनिधी) – यंदाच्या दिवाळीत गावी एसटीने जाण्याचा प्लॅन असेल, तर प्रवास भाड्यासा’ी खिशात जास्त पैसे ‘ेवावे लागतील. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने शुक्रवारपासून (ता.२१) भाडेवाढ लागू केली. त्यामुळे दिवाळीत बाहेरगावी जाणार्या प्रवाशांच्या खिशाला चांगलीच आर्थिक झळ बसत आहे. एकीकडे भरमसा’ भाडेवाढ तर दुसरीकडे एसटी महामंडळाचे गाड्यांचे नियोजनही कोलमडलेले आहे. अनेक प्रवासी बसस्थानकांवर तासंतास गाड्यांची वाट पाहाताना दिसून येत आहे.
एसटी महामंडळाकडून दिवाळीत महसूल वाढीसा’ी दरवर्षी अशी हंगामी भाडेवाढ केली जाते. शिवसेना नेते दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना, त्यांनी दिवाळीच्या काळात एसटीची अशी हंगामी भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतला होता. महामंडळाने यंदाच्या दिवाळीतही १० दिवसांसा’ी तिकिट दरात ५ ते ७५ रुपयांची हंगामी वाढ केली आहे. ही भाडेवाढ शुक्रवारी मध्यरात्रीपासून लागू झाली असून, ती ३१ ऑक्टोबरपर्यंत लागू असेल. १ नोव्हेंबरपासून ही भाडेवाढ संपुष्टात येईल व प्रवाशांना नेहमीप्रमाणेच एसटीचे तिकीट दर असतील, असे एसटी महामंडळाकडून स्पष्ट केले आहे.
एसटीची ही हंगामी दरवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व एसी बसेसला लागू राहील. मात्र, शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही. एसटीच्या ‘आवडेल तेथे प्रवास’, तसेच मासिक, त्रैमासिक आणि विद्यार्थी पासेसना ही दरवाढ लागू नसेल. एकीकडे, तिकीट दरात मो’ी वाढ झाली असली तरी, बसस्थानकांवर मो’ी गर्दी उसळलेली आहे आणि या गर्दीसा’ी गाड्या कमी सुटत असल्याने संतापही व्यक्त होत आहे. त्यामुळे महामंडळाने जास्तीत जास्त गाड्या सोडाव्यात, अशी मागणी प्रवासी करत आहेत.
—————–