उस्मानाबाद (विठ्ठल चिकुंद्रे) – प्राचीन बारव ही समाजाची फार मोठी संपत्ती आहे. परंतु, दुर्देवाने ही संपत्ती आज दुर्लक्षित आहे. तथापि, नारंगवाडी येथील युवकांनी या संपत्तीचे जतन व संवर्धन करण्याचा वीडा उचलत स्वयंस्फुर्तीने ही बारव स्वच्छ केली. बारव स्वच्छतेची ही चळवळ आता राज्यासमोर मोठा आदर्श ठरली आहे. या बारवेचे जलपूजन आणि वृक्षारोपणाचा कार्यक्रम आज मोठ्या उत्साहात आणि प्रेरणादायी वातावरणात पार पडला.
उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे आज (दि.१७) युवकांनी प्राचीन विहीर (बारव) स्वच्छ करून बारवेस पूर्वरूप प्रदान केले. या स्वच्छ व सुंदर बारवेचे जलपूजन आणि भोगेश्वर मंदिर परिसरात वृक्षरोपण मान्यवरांच्याहस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज दिंडेगावकर, शिवाजी कदम, प्रभारी तहासीलदार उमरगा, श्रीकांत उमरीकीर प्राचीन वास्तु संवर्धन संयोजक मराठवाडा, व्हीन्सेट पास्कीनेल्ली प्रâान्स, ह.भ.प.संपत महाराज आरणीकर, क्लाउडी डेनियल मोरांड प्रâान्स, संतोष वगंवाड बी.डी.ओ.उमरगा, श्रीकांत दहीफळे शिलालेख अभ्यासक, कृष्णा गुडदे, शिलालेख अभ्यासक, शैलेश महामुणी, फॅक्सी मॅम, प्रâान्स, अॅड. गिरीष पाटील, श्रीधर ढगे, कुमार जोशी, पोलिस पाटील हेंमतराव पाटील, मंडळ अधिकारी पी.जी.कोकणे, जे.एन.सांगवे, राजेंद्र चव्हाण, खंडु पवार, तलाठी एस.एस.गिरी, ग्रामसेवक जगदीश जाधव, जनार्धन आष्टे, विक्रम राजपुत, संजय पवार, शंकर पांचाळ, दादा चिकुंद्रे, पांडुरंग पवार, गणेश कोकाटे, नितीन कुलकर्णी, मनोज पवार, अमोल पवार, तुकाराम मुगळे, पांडुरंग चिकुंद्रे, प्रविण राजपुत, बालाजी आष्टे, अर्जुन आष्टे, विष्णू पांचाळ, ओमकार पाटील, दिलीप भुरे व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व बारव समितीचे पदाधिकारी उपस्थित होत. या महत्वपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन करून उपस्थितांचे आभार ‘ब्रेकिंग महाराष्ट्र’चे जिल्हा प्रतिनिधी विठ्ठल चिकुंद्रे यांनी केले.