चिखली (तालुका प्रतिनिधी) – बुलढाणा अर्बनच्या मेहकर शाखेची मासिक सभा आज (दि.१६) सकाळी ११ वाजता विभागीय व्यवस्थापक ज्ञानेश्वर देशमाने यांचे मार्गदर्शनाखाली उत्साहात संपन्न झाली असून, या सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. तसेच संस्थेतील अविरत २८ वर्षे सेवेबद्दल विभागीय व्यवस्थापक ज्ञानेश्वर देशमानेंचा सर्व व्यवस्थापकांनी गौरवपूर्ण सन्मान केला.
बुलडाणा अर्बन विभाग मेहकरमधील काही शाखा व्यवस्थापक यांनी आपले मनोगतसुद्धा व्यक्त केले. तसेच बुलडाणा अर्बन विभाग मेहकरचे विभागीय व्यवस्थापक ज्ञानेश्वर देशमाने यांचा सत्कार मेहकर शाखेचे शाखा व्यवस्थापक पंडित नवघरे यांनी केला. तसेच देशमाने यांना १५ ऑक्टोबर रोजी बुलढाणा अर्बन सेवेमध्ये अविरत असे २८ वर्ष पूर्ण केले. त्यांनी यांनी लिपिक, शाखा व्यवस्थापक, भरारी पथक ते विभागीय व्यवस्थापक अशा पदावर आपली सेवा देत असताना संस्थेच्या हिताचे बरेचसे नवनविन उपक्रम राबविले, ज्याही ठिकाणी काम केले त्या परिसरातील ठेवीदार, कर्जदार, सभासद तसेच कर्मचारी यांचे सुखदुःखात कधीही सर्वप्रथम सहभागी होवून सर्वांसोबत मैत्री, प्रेम, जिव्हाळा असे नाते निर्माण झाले. बुलडाणा अर्बनचे संस्थापक अध्यक्ष भाईजी, चिफ मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.झंवर सर, सौ. कोमलताई झंवर यांचे कल्पक विचारातून निर्माण होणारे सामाजिक उपक्रम नेहमी आपल्या विभागात राबवणारे बुलडाणा अर्बन विभाग मेहकरचे विभागीय व्यवस्थापक ज्ञानेश्वर देशमाने यांना बुलढाणा अर्बन विभाग मेहेकर येथे आज मेहकर विभागाचे शाखा व्यवस्थापक यांचे मासिक सभेमध्ये सर्व शाखा व्यवस्थापक यांनी २८ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. यावेळी मेहकर विभागातील सर्व शाखेचे मॅनेजर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार हिवरा आश्रम शाखेचे मॅनेजर भाटे यांनी मानले.