चिखली (तालुका प्रतिनिधी) – गुंजाळा येथील अंगणवाडी शाळेत जागतिक हातधुवा दिन १५ ऑक्टोबर रोजी साजरा करण्यात आला. चिखली एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागा अंतर्गत येणार्या गुंजाळा येथे दोन अंगणवाडी आहेत. या अगणवाडी शाळेमध्ये शासनाच्या आदेशानुसार १५ ऑक्टोबर २०२२ रोजी जागतिक हातधुवा दिवस साजरा करण्यात आला.
त्यामध्ये विध्यार्थ्यांना हात धुणे तसेच स्वच्छतेच्या संदेशाची अंमलबजावणी करणे, सवयीचा अंगीकार बालवयापासून होण्यासाठी तसेच विद्यार्थीच्या माध्यमातून हा प्रभावी संदेश घरोघरी पोचवण्यासाठी जागतिक हातधुवा दिवस साजरा करण्यासाठी बालकांना शाळेत जागतिक हात धुवा यावर मार्गदर्शन करून, विद्यार्थ्यांनी हात कसे धुवावे याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. तसेच या दिवशी अंगणवाडी सेविका मदतनीस यांनी विद्यार्थ्यांची गावातून प्रभातफेरी काढून शाळेत हातधुण्यापासून काय महत्व असते, असे आय. सी. टूल किटच्या माध्यमातून पटवून सांगितले. यावेळी सरपंच दिपक केदार, ब्रेकिंग महाराष्ट्रचे चिखली तालुका प्रतिनिधी तथा वरिष्ठ पत्रकार प्रताप मोरे तथा सर्व सदस्य , अंगणवाडी सेविका सौ. शारदा हिवाळे , मीरा खांदे , कविता गवई , मुख्याध्यापक इगळे , शेळके , शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन केदार , उपाध्यक्ष सुनील मोरे , सिध्दार्थ गवई, नारायण मोरे , राजू मोरे , बबन मोरे , सुभाष खिल्लारे , निवास मोरे , गजानन केदार , सुधाकर वनवे, तसेच गावांतील महिला पुरूष मंडळी उपस्थित होते.