– चिखली येथे पार पडले तीनदिवशीय प्रशिक्षण शिबीर
चिखली (तालुका प्रतिनिधी) – चिखली पंचायत समिती येथे १० ते १२ ऑक्टोबर या कालावधीत ग्रामरोजगार सेवक यांचे तीनदिवसीय उजळणी प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात करण्यापूर्वी पंचायत समितीच्या प्रभारी गटविकास अधिकारी आवळे मॅडम यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले, त्यानंतर त्यानंतर प्रशिक्षक म्हणून उपस्थित कैलास बेंद्रे, अमर पट्टेबहादूर जिल्हा वाशिम यांचे संघटनेच्यावतीने स्वागत करण्यात आले. ‘मी समृद्ध तर माझे गाव समृद्ध’ त्याचप्रमाणे ‘गावातील प्रत्येक कुटुंब लखपती’ कसे करता येईल, या संदर्भामध्ये शासनाच्या २६३ योजना कशा राबवाव्यात, ‘प्रत्येक कुटुंबाला लखपती कसं करावं’ या संदर्भात तीन दिवसांमध्ये शिकवण्यात आले.
शासकीय योजना कशा राबवाव्यात, कोणत्या कुटुंबाला कशा योजना पुरवाव्यात याचे प्रशिक्षण देण्यात आले. शिवार फेरी, गाव सर्वेक्षण, तसेच कुटुंब भेटी याचे प्रात्यक्षिक दिवठाणा या ठिकाणी घेण्यात आले. तसेच खेळाच्या माध्यमातून योजना ही कशी पोहोचावी याचोसुद्धा मार्गदर्शन या ठिकाणी प्रशिक्षकांनी केले. आज या कार्यक्रमाचा तिसरा दिवस होता, या समारोपीय कार्यक्रमाला कार्यक्रम अधिकारी तथा तालुका दंडाधिकारी येळे साहेब हे उपस्थित होते. त्याचप्रमाणे गटविकास अधिकारी पंचायत समिती चिखलीच्या आवळे मॅडम ह्या सुद्धा उपस्थित होत्या. तहसीलदार यांनी प्रशिक्षणाबद्दल कौतुक करून ग्रामरोजगार सेवक हा या योजनेतील किती महत्त्वाचा घटक आहे हे समजून सांगितले, व प्रमाणपत्राचे वाटप करून त्यांनी ग्राम रोजगार सेवकाला सदिच्छा दिल्या. त्याचप्रमाणे आवळे मॅडम गटविकास अधिकारी यांनीसुद्धा शुभेच्छा दिल्या.
यानंतर कार्यक्रमांमध्ये मनोगत दिनकर मोरे अध्यक्ष, गजानन निळे उपाध्यक्ष, राहुल गायकवाड, बबनराव गवई यांनी व्यक्त केले. कार्यक्रमामध्ये उपस्थित पंचायत समिती विस्तार अधिकारी जीवन फुलझाडे सर तसेच विस्ताराधिकारी सुरडकर सर, घुगे मॅडम, एपीओ खंडारे मॅडम, टी ए पडोळे मॅडम, टी. ए घट्टे सर, सी.डी.ई.ओ. उगले सर इत्यादी उपस्थित होते. तसेच रंगनाथ साळवे सचिव, मनोज बोंद्रे, रंगनाथ परीहार, दिनकर पडघान, समाधान खरात, सुरज रगड, बंडू नेवरे, नारायण सोळंके, प्रदीप खेडेकर, महादेव वाकडे, महादेव कुलूसुंदर, शेख हबीब बाबू, सोपान इंगळे, शेख मुबारक, भास्कर घुगे, संजय इंगळे, सुनील जवंजाळ, जीवन जाधव, प्रल्हाद गवई, प्रकाश सुर्वे, सुरेश खरात, गणेश हातागळे, दिलीप गाडेकर, गजानन गाडे असे ९९ ग्राम रोजगार सेवकापैकी ९४ ग्राम रोजगार सेवक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बबनराव गवई रोजगार सेवक अंबाशी यांनी केले. आभार प्रदर्शन वसंत नामदेव जाधव किन्होळा रोजगार सेवक तथा महाराष्ट्र राज्य कोर कमिटी सदस्य यांनी केले.