LATUR

स्व.रामचंद्रराव पाटील तळेगावकर खरेदी विक्री संघाच्यावतीने ४९ व्या वार्षिक सभेत सेवा सोसायटी संचालकांचा सत्कार

लातूर (जिल्हा प्रतिनिधी) – उदगीर येथील स्व.रामचंद्रराव पाटील तळेगावकर सहकारी खरेदी विक्री संघाची ४९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक २९ सप्टेंबररोजी सहकार महर्षी स्व.रामचंद्रराव पाटील (भाऊसाहेब) यांच्या प्रतिमेचे पूजन करून सुरू करण्यात आली. अध्यक्षस्थानी संघाचे जेष्ठ संचालक माजी चेअरमन व्यंकटराव पाटील होते. संघाचे चेअरमन भरतभाऊ चामले यांच्या संकल्पनेतून व लातूर जिल्हा बँकेचे संचालक भगवानराव पाटील तळेगावकर यांच्या मार्गदर्शनाने उदगीर तालुक्यातील सर्व निवडून आलेल्या विकास सोसायटीच्या चेअरमन, व्हा.चेअरमन व संचालक मंडळाचा त्यांनी गावपातळीवर केलेल्या सेवेची पोचपावती म्हणून गावकर्‍यांनी त्यांना निवडून दिले. त्यांना पुढेही लोकहीताची कामे करण्यास हुरूप यावा, म्हणून खरेदी विक्री संघात त्यांचा सत्कार करण्यात आला.

सुरूची भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. उदगीर, एकूर्का रोड,खेर्डा (खु.),अरसनाळ (महानगांव), डोंगरशेळकी, कल्लूर, हाळी, हंडरगुळी, देवर्जन, गंगापूर-भाकसखेडा, चिघळी,गुडसूर, नावंदी, नळगीर, देऊळवाडी, डाऊळ, किणी य. लोणी, कुमठा(खु.), गुरधाळ, शिरोळ जानापूर, बोरगाव (बु.), टाकळी वा., कोदळी, सुमठाना, नागलगांव, अवलकोंडा, धोंडीहिप्परगा, मोघा, शेल्हाळ, तोगरी, वायगाव, करवंदी, वाढवणा (बु.), बनशेळकी, नेत्रगाव, माळेवाडी, दावणगाव, हंगरगा आदी सोसायटी संचालक मंडळाचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संघाचे मार्गदर्शक भगवानराव पाटील तळेगावकर, चेअरमन भरतभाऊ चामले, व्हा.चेअरमन शंकरराव पाटील, संचालक रामराव बिरादार, किशनराव हरमुंजे, विठ्ठलराव मुळे, बाबासाहेब काळेपाटील, प्रभूराव पाटील, एम.डी.शिवाजी कवडे तसेच नामदेवराव पाटील बटनपूरकर, अशोकराव पाटील बटनपूरकर, संभाजी पाटील तळेगावकर, अ‍ॅड.दत्ता पाटील, बस्वराज पाटील मलकापूरकर, धनाजी गंगनबिडे आदी मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी भालचंद्र घोणसीकर, रामकिशन नादरगे, बाळासाहेब नवाडे, विजय येडले, बालाजी परगे, राजीव चामले, नागेश स्वामी, पवन बिरादार, संघाचे कर्मचारी मारोती बिरादार, संग्राम राठोड, ओम केंद्रे, शंकर विळेगावे, कल्पेश नवाडे, शिवा आदींनी परिश्रम घेतले. सूत्रसंचलन नंदकुमार पटने यांनी केले तर आभार बाबुराव अंबेगावे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!