औरंगाबाद (शिवनाथ दौंड) – हृदयविकाराचा तीव्र धक्का बसलेल्या १२/१३ वर्षाच्या मुलाला वेळीच वैद्यकीय मदत मिळाली नसती तर त्याच्या जीवावर बेतले असते. पहाटे साडेतीन वाजता १०८ क्रमांकाची व्हॅन वेळेवर आली नाही, पण पोलिसांनी हात करून थांबलेल्या खासगी गाडीने परिस्थिती ओळखून त्या मुलाला तातडीने एमजीएम रुग्णालयात नेले. प्रसिद्ध व्यावसायिक व सामाजिक कार्यकर्ते दीपक गोटे यांच्या तत्परतेमुळे एका मुलाचा जीव वाचू शकला आहे.
त्याचे असे झाले, की पहाटे ३:३० ची वेळ होती. दीपक गोटे यांना विमानतळावर जायची घाई होती. त्यांच्या गाडीला करोडी ते फतीयाबाददरम्यान जंभाळा फाटा येथे पोलीसांनी हात दाखवून गाडी थांबवण्याचे संकेत दिले. त्यांनी गाडी थांबवली. जवळच एका लोंडिग पीकअप मधे एक १२/१३ वर्षाचा संदेश भाऊसाहेब गायकवाड हा मुलगा होता. त्याला हार्टचा अॅटॅक आला होता. दवाखाना शक्य तितक्या लवकर जवळ करणे आवश्यक होते. परंतु मध्येच ती पिकअप व्हॅन ब्रेक डाउन झाली होती. वाहनांची तुरळक ये जा चालू होती. कोणी वाहन मदतीला थांबवेल याची शाश्वती नव्हती. तेवढ्यात पोलीसांची गाडी आली. त्यांना परिस्थितीची माहिती दिली. ते पण मदतीला धावले व गाडी थांबवण्यासाठी गाड्यांना हात दाखवू लागले. त्या १२/१३ वर्षाच्या मुलाचे पण दैव बलवत्तर होते. कसाबखेडा येथून दीपक गोटे हे औरंगाबादला जायला निघाले होते. मध्येच त्यांना गल्ले बोरगावचे पेशंट भेटले आणि दीपक भाऊने त्यांना अवघ्या २९ मिनिटRमधे दवाखान्यामधे पोहोच केले. तेपण विना मोबदला. भाऊसाहेब भाऊराव गायकवाड, आजिनाथ शिवाजी गायकवाड यांनी देवदूत बनवून आलेल्या दीपक गोटे यांचे आभार मानले. एमजीएम दवाखान्यात औषधं उपचार चालू झाले, व बाळाचा जीव वाचला. आता बाळ ठीक आहेत. संघर्ष ग्रुप संस्थापक अध्यक्ष संजय हाळनोर यांनी दीपक गोटे यांचे आभार मानून त्यांना धन्यवाद दिले.